सध्याची लहान मुलं ऑनलाइन विश्वात रमलेली पहायला मिळतात. ऑनलाइन विश्वात अनेक गोष्टींशी त्यांचा संबंध येतो ज्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. यावेळी मुलांचा पॉर्न पाहण्याकडेही कल असतो. अगदी लहान वयात त्याला सुरुवात होते. याशिवाय गेमिंग आणि पॉर्नचाही एकमेकांशी संबंध आहे. मुलं आणि ऑनलाइन जगताबद्दलची अशीच माहिती आपण लोकसत्ताच्या ‘सोशल Kid’a’ या विशेष सीरिजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. समाजमाध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

गेमिंग, पॉर्न, आई वडिलांच्या मोबाइलमधल्या गॅलरीत राहून गेलेल्या क्लिप्स अशा अनेक माध्यमातून लहान मुलं ऑनलाइन विश्वातल्या अनेक गोष्टींकडे आकर्षित होतात.. हा प्रवास कसा होतो, तो टाळता येणं शक्य आहे का, त्यावर काही मार्ग आहे का अशा अनेक बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत.