News Flash

वाहनधारकांनो लक्ष द्या; ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट वैधतेबाबत झाली महत्त्वाची घोषणा

करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय...

(संग्रहित छायाचित्र)

करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुन्हा एकदा मूदतवाढ दिली आहे. देशातील अनेक वाहनधारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, PUC किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

गेल्या वर्षी करोनामुळे लॉकडाउन लागल्यापासून मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने अनेकदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयाने ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पीयूसी यांच्या नूतनीकरणाची चिंता भेडसावणाऱ्या अनेक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 8:39 am

Web Title: govt extends validity of driving licence vehicle documents till june 30 sas 89
Next Stories
1 Jio चा ‘बेस्ट सेलर प्लॅन’ ! मिळेल तब्बल 126GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर्स
2 Nokia 5.4 च्या खरेदीवर 1500 रुपयांचं ‘गिफ्ट कार्ड’, 31 मार्चपर्यंत ऑफर
3 7,000 रुपयांनी स्वस्त झाला Oppo चा ‘प्रीमियम स्मार्टफोन’, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Just Now!
X