07 December 2019

News Flash

Grand i10 Nios चं उत्पादन सुरू, 11 हजारांत करा बुकिंग

ही कार म्हणजे थर्ड जनरेशन आय 10

Hyundai ची नवीन Grand i10 या कारच्या उत्पादनाला सुरूवात झालीये.  20 ऑगस्ट रोजी ही कार भारतात लाँच केली जाणार आहे. चेन्नई येथील कारखान्यात उत्पादनाला सुरूवात झाली असून पहिली Grand i10 Nios येथून बाहेर देखील पडली आहे. लाँचिंगआधीच कंपनीकडून या कारसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. 11 हजार रुपयांमध्ये कंपनीच्या डिलर्सकडे किंवा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू आहे.

ही कार म्हणजे थर्ड जनरेशन आय 10 आहे. सध्या बाजारात असलेल्या Grand i10 पेक्षा नवीन Grand i10 Nios दिसण्यास वेगळी आहे. डिझाइन बऱ्याच प्रमाणात सँट्रोच्या प्रेरणेतून घेतल्याचं दिसतंय. यात शार्प प्रोजेक्टर हेडलँम्प्स आणि कॅस्केडिंग ग्रिल आहे. यामुळे कारची पुढील बाजू दमदार दिसतेय. मागील बाजूला बंपर रुंद देण्यात आले असून सध्याच्या बाजारातील मॉडलपेक्षा जरा अजून खाली आहे. नव्या कारचं रिअर लूक यामुळे स्पोर्टी दिसतंय.

इंटेरियर 
डॅशबोर्ड आणि डुअरपॅड्सवर डिम्पल्ड टेक्स्चर्ड फिनिशिंग आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेसह 8-इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक एसी, सनरूफ आणि ब्ल्यू-लिंक कनेक्टिव्हिटी सिस्टिमसह अनेक लेटेस्ट आणि ग्रँड आय10 च्या तुलनेत प्रीमियम फीचर्स आहेत.

इंजिन –
Grand i10 Nios मध्ये 1.2-लिटर पेट्रोल आणि 1.2-लिटर डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे. दोन्ही इंजिन बीएस-6 मानकांनुसार असू शकतात.

किंमत – 
या कारसाठी कंपनीकडून बुकिंग सुरू करण्यात आली आहे. अद्याप कारच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही पण सध्या बाजारात असलेल्या मॉडलपेक्षा या कारची किंमत थोडीफार अधिक असू शकते. i10 ची किंमत 4.98 लाख ते 7.63 लाख रुपयांदरम्यान आहे.

First Published on August 13, 2019 2:08 pm

Web Title: grand i10 nios production started in chennai plant first car rolls out sas 89
Just Now!
X