ऑनलाइन शॉपिंगमध्ये मागच्या काही दिवसांत भारतात वेगाने वाढ झाल्याचे चित्र आहे. घरबसल्या एका क्लिकवर आपल्याला पाहिजे त्या वस्तू सहज उपलब्ध होत असल्याने ग्राहकांकडून अशा शॉपिंगला जास्त पसंती दिली जात आहे. याचाच फायदा घेऊन ऑनलाइन पोर्टलकडून खास ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. नुकताच अॅमेझॉनने ग्रेट इंडियन सेल जाहीर केला असून तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलचा नक्की विचार करा. अॅमेझॉन ही ऑनलाइन मार्केटमधील आघाडीची कंपनी असून २१ ते २४ जानेवारी या कालावधीत असणाऱ्या सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्पादनांवर भरघोस सूट दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही खरेदीची उत्तम संधी ठरणार आहे.

या सेलमध्ये १ कोटी ६० लाखांहून अधिक उत्पादनांवर सूट देण्यात आली आहे. यामध्ये अनेक कपडे, होम अॅप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. यात अॅपल, वनप्लस, सॅमसंग, यूसीबी, प्युमा, अदिदास, रॅँगलर, टायटन, अमेरिकन टुरिस्टर, बीपीएल, मायक्रोमॅक्स, टिसीएल, लेनोवा, एचपी, एलजी, बजाज, उषा यासारख्या असंख्य ब्रॅँड्सचा समावेश आहे. जे ग्राहक अॅमेझॉनच्या पे बॅलन्सचा वापर करून खरेदी करतील त्यांना २०० रुपयांपर्यत कॅशबॅक मिळणार आहे. सेलबरोबरच ग्राहकांना एचडीएफसी बँकेकडून जास्तीची १० टक्के कॅशबॅक सवलत देण्यात येणार आहे. जे ग्राहक एचडीएफसीचं क्रेडीट आणि डेबिट कार्डचा वापर करून इएमआयवर वस्तू घेतील त्यांना ही सुविधा दिली जाईल.