ग्रीन टी आणि रेड वाईनमध्ये आढळणारी संयुगे गंभीर विकासात्मक आणि मानसिक विकारांच्या निर्मितीस अडथळा आणतात. यामुळे काही जन्मजात चयापचयाच्या आजरांच्या उपचारांमध्ये मदत होऊ शकते असे एका अभ्यासात आढळले आहे.

चयापचयाचा विकार आनुवंशिकरीत्या असलेले बहुतेक जण सदोष जनुकांसह जन्माला येतात. यामुळे त्यांच्या शरीरात एन्झाईम द्रव्याची गंभीर कमतरता होते. यासाठी कोणताही उपचार नसल्यामुळे हे विकार असणाऱ्या रुग्णांना आयुष्यभर नियंत्रित आहाराचे सेवन करावे लागते. हा अभ्यास कम्युनिकेशन्स केमिस्ट्री या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. इस्रायलमधील तेल अवीव विद्यापीठातील संशोधकांनी एपिगॅलोकॅटेचिन गॅलेट (ईजीसीजी)आणि टॅनिन आम्ल या दोन घटकांचा अभ्यास केला. ईजीसीजी हे नैसर्गिकरीत्या ग्रीन टीमध्ये आढळून येते.

रेड वाईनमध्ये आढळणारे टॅनिन आम्ल यामुळे स्मृतिभ्रंश किंवा कंपावातासारखे रोग विकसित होण्यास अडथळा निर्माण होतो. संशोधकांनी अभ्यास केलेल्या आनुवंशिक रोगांमध्ये शरीरात चयापचयासाठी आवश्यक असणारे आम्ल तयार होत नसल्याचे, तेल अवीव विद्यापीठाचे शिरा शाहाम-नीव यांनी सांगितले. आम्लांच्या अभावामुळे गंभीर विकासात्मक आणि मानसिक रोग विकसित होण्याचा धोका वाढतो, शाहाम-नीव यांनी सांगितले. पुन्हा एकदा गंभीर आजारांवर सर्वोत्कृष्ट औषधे ही निसर्गातच उपलब्ध असल्याचे आमच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या आजारांमध्ये जन्मजात चयापचयाचा आजार फेनिएलॅनिन याचादेखील समावेश आहे.

हा आजार असलेल्या लोकांना आयुष्यभर आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. ईजीसीजी आणि टॅनिन आम्ल यांचा अडेनाईन, संचयी टायरोसिन आणि फेनिएलॅनिन या रोगांविरोधात परिणाम तपासण्यात आला. यातून सकारात्मक परिणाम पुढे आले असल्याचे संशोधकांनी सांगितले.