प्रत्येकाची सकाळ गरमागरम चहाने सुरु होते. ‘गवती चहा’, ‘मसला चहा’, ‘आलं-वेलचीयुक्त चहा’ असे चहाचे अनेक प्रकार आपल्यापैकी बहुतेकांच्या आवडीचे असतात. बाजारात ब्लॅक, ग्रीन, उलोंग टी या स्वरूपात चहा मिळतो. या सर्व पर्यायांत ‘ग्रीन टी’चा पर्याय सवार्थानs चांगला म्हणता येईल. कारण इतर प्रकारांच्या मानाने ‘ग्रीन टी’ बनवताना कमीत कमी प्रक्रिया केली जाते. फक्त उकळवणे आणि वाळवणे या प्रक्रियेमुळे चहाचा रंग कायम ठेवला जातो. त्यामुळे इतर चहापेक्षा यातली पोषकतत्त्व आणि संप्रेरक नष्ट न होता ती कायम राहतात. संशोधकांनी जेव्हा जपानमधल्या विविध भागांचा अभ्यास केला, तेव्हा तिथल्या भागांत ‘ग्रीन टी’ जास्त प्यायला जातोय व त्यामुळे तिथे कर्करोगाचे प्रमाण तुलनेत कमी असल्याचे आढळले. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण लक्षणीय असते. त्यातील फ्लेव्होनाइड्समुळे शरीरातील विषद्रव्ये आणि चयापचयामुळे तयार होत असणा-या प्रीरेडिकल्सच्या प्रमाणात चांगली घट होऊ शकते. या गुणांमुळे केवळ कर्करोगच नाही तर हृदयरोग, मधुमेह, वाढते कोलेस्टेरॉल यांसारख्या अनेक विकारांना दूर ठेवता येऊ शकते. याव्यतिरीक्त वाढते वय झाकण्याचा गुण या ग्रीन टीमध्ये असतो. ग्रीन टीमधील गुणांमुळे शरीरातील चयापचयाची गती वाढते आणि त्यामुळेच वजन कमी होण्यास मदत मिळते.ग्रीन टीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फ्लूसारख्या आजारापासून आपला बचाव होऊ शकतो. दातांच्या आरोग्यासाठी ग्रीन टीचा चांगला उपयोग होऊ शकतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 5, 2013 11:33 am