20 September 2018

News Flash

वेडिंग अल्बम निवडण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहाच!

वेडिंग अल्बम निवडायचा कसा? हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासमोर असेल म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आणलाय हा खास व्हिडिओ

वेडिंग अल्बम निवडायचा कसा? हा सर्वात मोठा प्रश्न असतो.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. हल्ली वेडिंग फोटोग्राफी, प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग असे नवनवे ट्रेंड सुरू झाले आहेत. पण फोटोग्राफीबरोबरच लग्नाच्या अल्मबबाबतही ग्राहकांनी सजक असायला हवं. अनेक जोडप्यांना वेडिंग अल्बमसाठी पैसे खर्च करणं म्हणजे मोठी खर्चिक बाब वाटते. ‘कशाला खर्च करायचे एवढे पैसे? नाहीतरी अल्बम नंतर पडूनच राहणार आहे त्यापेक्षा दुसरीकडे पैसे खर्च करा” असे डायलॉग सर्रास कानावर पडतात. पण लग्न झाल्यावर जेव्हा हाच अल्बम कित्येक वर्षांनी आपण उघडून पाहतो तेव्हा ते अनमोल क्षण पुन्हा जगताना किती आनंद मिळतो, हा आनंद पैशांत मोजता न येण्यासारखाच आहे. आपण लग्नासाठी कित्येक वायफळ गोष्टींवर खर्च करतो पण आठवणी जपून ठेवण्यासाठी थोडे अधिक पैसे खर्च केले तर? ही कल्पना नक्कीच चांगली असेल.

HOT DEALS
  • Samsung Galaxy J6 2018 32GB Black
    ₹ 12990 MRP ₹ 14990 -13%
  • Jivi Energy E12 8 GB (White)
    ₹ 2799 MRP ₹ 4899 -43%

आता हा वेडिंग अल्बम निवडायचा कसा? हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासमोर असेल म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आणलाय हा खास व्हिडिओ ज्याच्या मदतीनं वेडिंग अल्बम कसा निवडायचा? त्यासाठी किती पैसे खर्च करायचे? कोणत्या प्रकारचा अल्बम दीर्घकाळ टिकतो? यासारख्या तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पाहा आणि हो तुमच्या ओळखीच्या मित्र मैत्रिणींचं लग्न होत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका!

First Published on May 17, 2018 4:33 pm

Web Title: guideline how to choose wedding album and what is the difference between karizma and photobook album