‘रोझ डे’ आणि ‘प्रपोझ डे’ला तुमच्या आवडत्या व्यक्तीपाशी तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्या नसतील तर चाॅकलेटचं गोड गिफ्ट देत आपल्या मनातली गोष्ट सांगण्याचा दिवस असतो तो चॉकलेट डेचा आहे.

पण हे करताना कोणतीही चाॅकलेट्स द्यायची नाही राव! गुलाबांप्रमाणेच वेगवेगळ्या चाॅकलेट्सनाही वेगवेगळे अर्थ असतात. प्रत्येक चाॅकलेट गिफ्टच करण्यामागे एक वेगळा संदेश आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मनात पोचतो. तर पाहुयात चाॅकलेट्सचेही वेगवेगळे प्रकार आणि चॉकलेट डेच्या दिवशी त्याचे अर्थ काय होतात ते

importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: ट्रेड अप्रेंटिसच्या ३३५ जागांसाठी निघाली भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज

डार्क चाॅकलेट:

डार्क आणि स्ट्राँग!
डार्क आणि स्ट्राँग!

नावाप्रमाणेच या चाॅकलेटची टेस्ट स्ट्राँग असते. काहीशी कडवटही असते. पण या चाॅकलेट्सचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आपल्या नेहमीच्या चाॅकलेट्सपेक्षा जरा हटके टेस्ट असलेल्या डार्क चाॅकलेट्सच्या गिफ्टमधून आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह असल्याचं  सूचित केलं जातं. आपण त्या व्यक्तीसाठी ‘डिपेंडेबल’ आहोत हेही डार्क चाॅकलेट देऊन सूचित केलं जातं. काहीशी रांगडी चव असणारी ही चाॅकलेट्स आपण आपल्या जोडीदाराला सुरक्षित ठेवू, त्याची किंवा तिची काळजी घेऊ असं सुचवतं.

भारतात मिळणारी काही डार्क चाॅकलेट्स- कॅडबरी बोर्नविल, टाॅबलराॅन डार्क चाॅकलेट, किटकॅट डार्क, स्निकर्स डार्क, मेसन, वोशेल

व्हाईट चाॅकलेट:

सौम्य आणि एलिगंट
सौम्य आणि एलिगंट

व्हाईट चाॅकलेटची स्वत:ची एक वेगळीच टेस्ट असते. भारतात हा प्रकार तुलनेने कमी लोकप्रिय आहे पण याचे डायहार्ड फॅन्सही भरपूर आहेत. व्हाईट चाॅकलेट्सचं गिफ्ट ‘ एलिगंट’ मानलं जातं. व्हाईट चाॅकलेटची टेस्ट काहीशी सौम्य असल्याने एक ‘स्वीट’ गिफ्ट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आपल्याला आवडणारी व्यक्ती अशा स्वभावाची असली तर तिला व्हाईट चाॅकलेट भेट द्यायला हरकत नाही.

व्हाईट चाॅकलेट्स- टाॅबलराॅन व्हाईट चाॅकलेट, चाॅकोव्हिल, नेसले मिल्कीबार, लिंट, बोल्ड एन् एलिगंट

 

मिल्क चाॅकलेट:

सर्वात लोकप्रिय चाॅकलेटचा प्रकार
सर्वात लोकप्रिय चाॅकलेटचा प्रकार

मिल्क चाॅकलेट म्हणजे व्हाईट चाॅकलेट नाही. मिल्कीबारच्या लोकप्रियतमुळे आणि एका विशिष्ट पध्दतीने झालेल्या त्याच्या मार्केटिंगमुळे भारतात हा मोठा गैरसमज आहे. कॅडबरीची नेहमीची चाॅकलेट्स हे मिल्क चाॅकलेट्चं अगदी काॅमन उदाहरण आहे. भारतात मिल्क चाॅकलेटला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. चाॅकलेट डे ला सुध्दा साधारणपणे कॅडबरी दिलं जातं. रोमँटिक भावनांशी मिल्क चाॅकलेटला जोडलं जातं.

मिल्क चाॅकलेट्स- कॅडबरीचे डेअरी मिल्क, सिल्क आणि बाकी चाॅकलेट्स, नेस्लेचीही मिल्क चाॅकलेट्स मोठ्या प्रमाणावर बाजारात आहेत. याशिवाय टाॅबलराॅन मिल्क चाॅकलेट, श्मिटन, लिंट मिल्क चाॅकलेट असे तुलनेने महाग आॅप्शन्सही आहेत.