News Flash

तिळगुळ घ्या गोडगोड बोला… आपल्या प्रियजनांना द्या मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

आपल्या प्रियजनांना गोड शुभेच्छा संदेश पाठवून सणाचा आनंद द्विगुणित करा....

मकरसंक्रांत म्हटलं की उंच भरारी घेणाऱ्या पतंगांचे चित्र डोळ्यासमोर उभे राहतेच..(संग्रहित छायाचित्र)

मकरसंक्रांत म्हटलं की पहिले डोळ्यासमोर येतात ते उंच भरारी घेणारे पतंग आणि तिळ-गुळाचे स्वादिष्ट लाडू. जुने झाले गेले विसरुन पुन्हा नव्याने मैत्री-नाते जोडण्याचा हा गोड सण आहे. एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्याचा हा क्षण आहे. जर आपण आपल्या गावी असाल तर आपल्या कुटुंबियांसोबत आणि हा सण साजरा करण्याची पर्वणी काही खासच ठरेल. परंतु जर तुम्ही तुमच्या कुटुंबियांपासून दूर असाल, तुमचे मित्र परगावी असतील तर त्यांना व्हाट्सअॅप किंवा एसएमएसने शुभेच्छा देण्यास विसरू नका. आम्ही काही एसएमसचे संकलन येथे केले आहे.

१. आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा….!
तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला!

२. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

३. मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान…
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

४. एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला.
खुद्कन हसला, हातावर येताच बोलू लागला..तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

५. तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडू…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

६. तीळ आणि गुळासारखी रहावी, आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

७. नात्यातील कटुता इथेच संपवा….तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला…!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

८. झाले– गेले विसरुन जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलू..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

९. मनात असते आपुलकी, म्हणुन स्वर होतो ओला.. हलवा–तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला…!

१०. मांजा, चक्री… पतंगाची काटाकाटी… हलवा, तिळगुळ, गुळपोळी… संक्रांतीची लज्ज्त न्यारी… पतंगाप्रमाणे घ्या आकाशी भरारी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

११. अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

१२. नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे… तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे….तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

१३. तिळाचे आणि गुळाचे होता मनोमिलन… बनला गोड लाडू…
देऊन एकमेका तीळगुळ नाती नवी जोडू

१४. तुमच्या यशाचा पतंग उंचच उंच उडत राहो हीच सदिच्छा

१५. गुळाची गोडी.. त्याला तिळाची जोडी.. नात्यांचा गंध त्याला स्नेहाचा सुंगध मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

१६. उडवू पतंग जमवून सवंगडी, आवडीने चाखू तिळगुळाची गोडी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2017 10:00 am

Web Title: happy makar sankranti 2017 wishes sms send these happy sankranti greetings and messages to your friends
Next Stories
1 वाढत्या तणावामुळे हृदयरोगाचा धोका अधिक
2 कर्करोग औषधांच्या चाचण्यांसाठी नवे उपकरण
3 केळी, बटाटय़ातील प्रतिरोधक स्टार्चचा आरोग्यास फायदा
Just Now!
X