News Flash

‘हर रिचार्ज पे इनाम’, व्होडाफोनची भन्नाट ऑफर

रिचार्ज करायला कोणतीही अट नाही म्हणजे ही ऑफर कमी किंमतीच्या कोणत्याही रिचार्जसोबत लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा ऑफरचा लाभ

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने एक खास ऑफर आणली आहे. ‘हर रिचार्ज पे इनाम’ या नावाने आणलेल्या या ऑफरमध्ये कंपनी सर्वच प्रीपेड रिचार्जवर ग्राहकांना विविध फायदे देत आहे. व्होडाफोनची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असणार आहे.

काय आहे ऑफर –
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी रिचार्ज करायला कोणतीही अट नाही, म्हणजे ही ऑफर कमी किंमतीच्या कोणत्याही रिचार्जसोबत तसंच स्वस्त एसएमएस आणि इंटरनेट डेटा पॅकवर देखील लागू असेल. या ऑफरअंतर्गत व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना अतिरिक्त फायदे दिले जातील. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, अतिरिक्त डेटा, कॅशबॅक, मोफत एसएमएस, कॉलर ट्युन आणि मिस्ड कॉल अलर्ट यांसारख्या सेवांचा समावेश आहे. कंपनीकडून मिळणारे फायदे रिचार्ज केलेल्या किंमतीपेक्षा अधिक देखील असू शकतात. देशातील सर्व सर्कलमध्ये ही ऑफर लागू असेल. ग्राहक व्होडाफोन संकेतस्थळ, माय व्होडाफोन अॅप , अन्य कोणतंही रिचार्ज अॅप किंवा कोणत्याही दुकांनामधून रिचार्ज करु शकतात. या शानदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी केवळ एकच अट आहे, आणि ती म्हणजे रिचार्ज झाल्यानंतर तुमच्या फोनवरुन *999# हे डायल करा किंवा ‘माय व्होडाफोन अॅप’ ओपन करा आणि त्यानंतर माय रिवार्ड्स हा पर्याय निवडून काय फायदे मिळालेत हे पाहा. रिचार्ज केल्यानंतर 72 तासांमध्येच ही प्रक्रीया पार पाडणं गरजेचं आहे अन्यथा ऑफरचा लाभ मिळू शकणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2019 4:20 pm

Web Title: har recharge pe inaam vodafone brings new offer cashback extra data other rewards all you need to know sas 89
Next Stories
1 आता अ‍ॅमेझॉन उतरणार फूड डिलिव्हरी क्षेत्रात, झोमॅटो-स्विगीला टक्कर
2 आता ऑफलाइन खरेदी करा Realme चे 2 शानदार स्मार्टफोन
3 महाराष्ट्र सरकारच्या पथदर्शी प्रकल्पात मेगाभरती
Just Now!
X