20 October 2020

News Flash

Harley-Davidson ची सर्वात स्वस्त बाइक, ‘बुलेट’ला देणार टक्कर

इतर देशांमध्ये विक्री वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न

(कंपनीने बाइकच्या प्रोटोटाइपचा एक फोटो जारी केला)

अमेरिकी कंपनी हार्ले डेव्हिडसनने 338cc इंजिन क्षमतेची बाइक लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीची ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाइक असेल असं जाहीर करण्यात आलं आहे. यासाठी कंपनीने चीनची कंपनी Qianjang Motorcycle सोबत भागीदारी केली आहे.

या भागीदारीनुसार, हार्ले-डेव्हिडसन आपली 338cc इंजिन क्षमतेची सर्वात स्वस्त बाइकची निर्मिती चीनमध्ये करणार असून त्यानंतर अन्य देशांमध्ये निर्यात केली जाईल. कंपनीने या बाइकच्या प्रोटोटाइपचा एक फोटो देखील जारी केला आहे.

हार्ले-डेव्हिडसनच्या नव्या 338 cc बाइकमध्ये LED हेडलँप्स, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, मागील आणि पुढील बाजूला ABS फीचर्ससह डिस्क ब्रेक आणि ट्रिम्ड एग्जॉस्ट हे फीचर्स असतील अशी शक्यता आहे.

2021 मध्ये भारतात –
ही बाइक सर्वप्रथम 2020 च्या अखेरपर्यंत चीनमध्ये लाँच केली जाईल. त्यानंतर अन्य आशियाई देशांच्या बाजारात ही बाइक उतरवली जाईल. भारतीय बाजारात 2021 पर्यंत ही बाइक दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Royal Enfield Bullet शी टक्कर –
हार्लेच्या या नव्या बाइकमुळे रॉयल एनफील्डच्या बुलेटला थेट आव्हान मिळू शकते. कारण, रॉयल एनफिल्डच्या एंट्री लेवलची बाइक 350 सीसी क्षमतेचीच असते.

Qianjiang सोबत भागीदारी का –
Qianjiang कडे प्रीमियम स्मॉल डिस्प्लेसमेंट बाइक बनविण्याचा दांडगा अनुभव आहे. नव्याने उदयास येणाऱ्या बाजारांबाबत आणि बाइकला चांगली मागणी मिळावी यासाठी त्यांचे विविध देशांमध्ये चांगले संपर्क आहेत.

विक्री वाढवण्याचा प्रयत्न –
116 वर्षे जुनी हार्ले-डेव्हिडसन कंपनी ‘हेवी टुरिंग’ बाइकसाठी ओळखली जाते. इतर देशांमध्ये विक्री वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आशियाच्या बाजारात हलक्या आणि इलेक्ट्रिक बाइक आणायच्या तयारीत असल्याची घोषणा कंपनीने गेल्या वर्षीच केली होती. अमेरिकेत विक्री कमी होत असल्याने कंपनी इतर देशांमध्ये विक्री वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

किंमत किती – हार्लेची ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाइक असेल असं जाहीर करण्यात आलं असलं तरी अद्याप या बाइकच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 2:29 pm

Web Title: harley davidsons new 338cc most affordable bike know all specifications sas 89
Next Stories
1 48MP रोटेटिंग कॅमेरा, 5,000 एमएएच बॅटरी ; Asus 6Z भारतात लाँच
2 International Yoga Day 2019: ही दहा योगासने करा आणि अनेक आजारांपासून मुक्ती मिळवा
3 International Yoga Day 2019 : योग शिकताना या चुका टाळाच
Just Now!
X