– मानसी पंडित

हस्तसामुद्रिक ही भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक लोकप्रिय पद्धत आहे. तळहातांवरच्या रेषा, उंचवटे यांच्या अभ्यासातून ही पद्धत विकसित झाली आहे. कुंडलीशास्त्र किंवा अंकशास्त्र यावर जसा नवग्रहांचा प्रभाव असतो अगदी तसेच हस्तरेषांवरही नवग्रहांचा प्रभाव असतो. धनरेषा (भाग्यरेषा) बद्दल जाणून घेऊयात..

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

धनरेषेचा उगम शत्रुक्षेत्रात झाला असेल तर त्या व्यक्तीचा भाग्योदय वयाच्या ३५व्या वर्षी होतो. चंद्र उंचवटय़ावरील निघालेली एखादी रेषा धनरेषेला जाऊन मिळत असेल तर त्या व्यक्तीला नोकरीबरोबरच व्यवसायामधूनही चांगला आर्थिक लाभ होतो. धनरेषेचा उगम आयुष्यरेषेबरोबर झाला असेल तर वडिलोपार्जित व्यवसाय केल्यामुळेच त्या व्यक्तीचा भाग्योदय होतो. धनरेषेवर कोठेही त्रिकोणाचे चिन्ह असल्यास त्या व्यक्तीला समाजामध्ये चांगली प्रसिद्धी व लोकप्रियता लाभते.

मणिबंधापासून निघालेली धनरेषा अंगठय़ाच्या तळाशी जाऊन संपत असेल तर अशा व्यक्तीला राजसुखाची प्राप्ती होते, म्हणजे त्या व्यक्तीला सर्वोच्चपद प्राप्त होते, सर्व प्रकारची भौतिक सुखे उपभोगण्यास मिळतात. मणिबंधातून निघालेली धनरेषा तर्जनीच्या तळाशी जाऊन संपत असेल तर अशी व्यक्ती राजकारणात मोठे कर्तृत्व गाजवू शकते. मंत्रिपद किंवा त्याहूनही मोठे पद अशा व्यक्तीला लाभते.

मणिबंधातून निघून मध्यमेकडे गेलेली धनरेषा प्रसिद्धी व कीर्ती दर्शविते. अशा व्यक्तीला तिच्या क्षेत्रात मोठे मानसन्मान, प्रसिद्धी व अफाट कीर्ती लाभते. समाजातही हे लोक लोकप्रिय असतात. मणिबंधातून निघालेली धनरेषा अनामिकेकडे जात असेल तर अशी व्यक्ती श्रीमंत किंवा गर्भश्रीमंत असतेच, पण समाजाचे नेतृत्व करण्याची संधीही तिला मिळते. समाजाचा चांगला पाठिंबा यांना कायमस्वरूपी मिळत राहतो.

मणिबंधापासून निघालेली धनरेषा करंगळीकडे जात असेल तर अशा व्यक्तीला यश व प्रतिष्ठा भरभरून लाभते. सर्व प्रकारची प्रापंचिक व भौतिक सुखे या व्यक्तीच्या वाटय़ाला येतात. त्यामुळे साहजिकच ही व्यक्ती समाधानी आणि उत्साही दिसते. राजयोग हा योग हातावर असलेली व्यक्ती सुंदर आणि आकर्षक असते. अशा व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमत्त्व लाभलेले असते. तिला आर्थिक स्थैर्य चांगले मिळते. अशा व्यक्तीने अगदी किरकोळ पदावरून नोकरीस सुरुवात केली तरी कष्ट, जिद्द आणि धडाडीच्या बळावर सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते. पण हा राजयोग सहज मिळतो का? तर त्याच्याबरोबर जिद्द, कष्ट, धडाडी ही आलीच, त्याशिवाय का मिळते ते? म्हणजे सरतेशेवटी हातावरील धनरेषा कितीही चांगली असेल तरी कष्टाशिवाय फळ नाही, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असे कधी होत नाही.

तळहातावर शनी आणि शुक्र उंचवटा अत्यंत प्रभावी असल्यास आणि धनरेषेचा उगम शुक्र उंचवटय़ावरून होत असेल आणि ती शनी उंचवटय़ाच्या मध्यबिंदूपर्यंत पोहोचत असल्यास राजयोग निर्माण होतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, शुक्र ऐश्वर्याचा आणि शनी कष्टाचा, कर्माचा कारक आहे आणि हे दोघे परममित्र आहेत. त्यामुळे राग, अहंकार सोडून कष्टाला, कर्माला प्राधान्य दिले तरच तुम्हाला या राजयोगाचे फळ मिळणार.

शुक्र उंचवटय़ावरून निघालेली रेषा बुध उंचवटय़ाकडे जात असेल तर तिलाही धनरेषा म्हणतात व ही रेषा व्यक्तीस श्रीमंत बनवण्यास निश्चितपणे मदत करते. चंद्र उंचवटय़ावरून उगम पावलेली धनरेषा सरळ आणि स्पष्ट असून गुरू उंचवटय़ाकडे गेलेली असेल तर अशी व्यक्ती धनधान्याच्या बाबतीत नशीबवान ठरते.

बुध उंचवटय़ावरून निघालेली धनरेषा कोठेही न तुटता अखंडपणे शनी उंचवटय़ावर जात असेल तर राजयोग बनतो. चंद्ररेषा व धनरेषा शनी उंचवटय़ावर जात असेल तर राजयोग बनतो. मणिबंधापासून निघून थेट शनी उंचवटय़ावर जाणारी धनरेषा श्रेष्ठ मानण्यात आलेली आहे, त्यामुळे श्रीमंतीबरोबर शुद्ध चारित्र्य लाभते. गुरू व बुध उंचवटय़ाकडे जाणारी धनरेषा त्या ग्रहांच्या शुभ फलात वाढ करते.

साम्राज्यपतीयोग म्हणजे निव्वळ श्रीमंत बनविणारा योग नव्हे. या योगाच्या प्रभावाने माणूस गर्भश्रीमंत बनतोच, पण त्याचबरोबर त्याला जागतिक पातळीवर लोकप्रियता, प्रसिद्धी व नावलौकिकही मिळू शकतो. दोन्ही हातांवरील रेषांनी मणिबंधावर माशाची आकृती तयार झाली असेल, नंतर त्या रेषा शनी उंचवटय़ावर गेलेल्या असतील आणि रवीरेषा लांब असून बुध उंचवटय़ाला स्पर्श केलेली असेल, तसेच हातावर रवी, शनी, शुक्र हे उंचवटे प्रभावी असतील तर साम्राज्यपतीयोग बनतो. हातावर असा योग असेल तर अशा व्यक्तीस सामाजिक, प्रापंचिक, कौटुंबिक, भौतिक अशी सुखे मिळतात. पण एक लक्षात ठेवा, या योगामध्ये तळहाताचा रंग लालसर असावा आणि दोन्ही हातांवर स्पष्ट शनीरेषा व रवीरेषा असावी, त्याचबरोबर रवी, शुक्र व सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनी उंचवटा प्रभावी असावा.

हस्तसामुद्रिकशास्त्रामध्ये ब्रह्मांडयोग नावाचा एक योग आहे. हा योग हातावर असलेली व्यक्ती आर्थिकदृष्टय़ा संपन्न असून त्या व्यक्तीला राजेशाही थाटाचे ऐशोरामी जीवन लाभते. हा योग हातावर असेल तर तो हात आदर्श प्रकारचा असतो. चंद्र व शुक्र उंचवटे दोन लांब रेषांनी जोडलेले असतील तर हातावर ब्रह्मांडयोग निर्माण होतो. अंगठा लांब, मागच्या बाजूला झुकलेला असेल व शुक्र उंचवटा प्रभावी असेल तर ब्रह्मांडयोग बनतो. चंद्र उंचवटय़ावरून दोन रेषा निघून त्यांपैकी एक रेषा शुक्र उंचवटय़ावर व दुसरी बुध उंचवटय़ावर जात असेल आणि त्याचबरोबर हातावर रवीरेषा असेल तर ब्रह्मांडयोग निर्माण होतो. मध्यमेच्या म्हणजे शनी बोटाच्या दुसऱ्या पेरावर तीन किंवा चार उभ्या रेषा असतील तर ब्रह्मांडयोग बनतो.

चंद्र, गुरू, शुक्र हे शुभ ग्रह आहेत. हे ग्रह शुभ फल देणारच, परंतु शनी ग्रहाला पाप ग्रह मानतात. तरीसुद्धा प्रत्येक योग हा शनीपर्यंत जाऊन बनलेला आहे. म्हणूनच की काय, शनी हा पापग्रह नसून तुमच्या जीवनाला घडवून खरा अर्थ लावणारा तुमचा गुरू आहे. त्याची फक्त तत्त्वे समजून घ्या म्हणजे त्याच्याबद्दलचे गैसमज दूर होतील. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवनाचा अर्थ कळेल. ब्रह्मांडयोग सांगत असताना अंगठा मागच्या बाजूस झुकलेला असावा असे सांगितले आहे. अंगठा मागच्या बाजूस झुकणे म्हणजे ती व्यक्ती नम्र व लीन आहे असे समजले जाते. म्हणजे थोडक्यात काय, सहनशीलता, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची क्षमता आणि नम्रता असेल तरच हे सगळे योग आपल्या नशिबात आहेत.

सौजन्य : लोकप्रभा