News Flash

संधिवात असणाऱ्यांसाठी किवी ठरेल वरदान; जाणून घ्या फायदे

किवी खाण्याचे ९ फायदे

आज कालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला फास्टफूड खाण्याचं छंद जडला आहे. त्यामुळे घरातील सकस आहार किंवा पालेभाज्या, फळे खाण्यास प्रत्येक जण टाळाटाळ करताना दिसतो. शरीराच्या योग्य वाढीसाठी आहारात सगळ्या पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. त्यामुळे कडधान्य, फळे अशा सगळ्याचा आहारात समावेश करा असं डॉक्टर वारंवार सांगतात. अनेक जण फळं खाण्यास कंटाळा करतात. मात्र, प्रत्येक फळामध्ये खास गुणधर्म असतात. जे शरीरासाठी फायद्याचे असतात. त्यामुळेच आज किवी खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

२. शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम करते

३. संधिवाताची समस्या कमी होते.

४. आमवात, दमा या रोगांवर गुणकारी.

५. मधुमेहींसाठी फायदेशीर.

६.कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

७. लघवीच्या जागेवर खाज किंवा जळजळ होत असल्याच किवी खाल्ल्यामुळे फायदा होतो.

८. जखम लवकर भरुन निघते.

९. पचनक्रिया सुधारते.

वाचा : पायांच्या दुखण्यामुळे त्रस्त असाल तर जीवनशैलीत करा ‘हा’ बदल

कोणी खाऊ नये ?

पित्ताशय व मूत्रपिंडांशी संबंधित आजार असलेल्यांनी फळ खाणे टाळावे. काही लोकांना किवीची अ‍ॅलर्जी असू शकते. तोंडाला खाज येते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 5:12 pm

Web Title: health benefits kiwifruit nutritional information ssj 93
Next Stories
1 पायांच्या दुखण्यामुळे त्रस्त असाल तर जीवनशैलीत करा ‘हा’ बदल
2 आठवड्यात तीन दिवस ऑफिस आणि तीन दिवस ‘वर्क फ्रोम होम’, Google ची कर्मचाऱ्यांसाठी नवी पॉलिसी
3 आत्मनिर्भर भारत: जगातली सर्वात मोठी स्कूटर फॅक्टरी उभारणार Ola, ‘या’ राज्यासोबत झाला करार
Just Now!
X