News Flash

बहुगुणी आवळा! जाणून घ्या फायदे

आवळा खाण्याचे 'हे' फायदे माहित आहेत का?

चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो. पूर्वी शाळेजवळ चिंचा-कैरी विकणाऱ्यांकडे आवळा हा आवर्जुन असायचा. त्यामुळे शाळेतील लहान मुलं हमखास आवळा खायचे. परंतु आता ते प्रमाण कमी झालं आहे. खरं तर आवळ्याचं प्रत्येकाने सेवन केलं पाहिजे. आवळ्याचे अनेक फायदे आहेत.

दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहारात आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करतात. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. आवळ्याचे ‘पांढरे आवळे’ आणि ‘रान आवळे’ असे दोन प्रमुख प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला तर मग या बहुगुणी आवळ्याचे फायदे जाणून घेऊ.

आवळा खाण्याचे फायदे –

१. डोकं शांत राहतं. तसंच केसांच्या तक्रारीही दूर होतात. केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी.

२. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल.

३. लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे.

४. नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होतं.

५. आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा.

६. आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.

७. आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 4:39 pm

Web Title: health benefits of amla gooseberry ssj 93
Next Stories
1 कसा आहे सॅमसंगचा लेटेस्ट Galaxy A21s ?,’रेडमी नोट 9 प्रो’ला देणार टक्कर
2 जिओसाठी आनंदाची बातमी… पुढील तीन वर्षांत घेणार गरुडझेप; ग्राहकांचा आकडा वाचून व्हाल थक्क
3 Twitter ने आणलं नवं फीचर, आता फक्त बोलून करता येणार ‘ट्विट’
Just Now!
X