News Flash

कडू तरी गुणकारी!

कारलं खा आणि आजारांना ठेवा दूर

कारलं या भाजीचं नाव जरी घेतलं तरी अनेक जण नाक मुरडतात. परंतु चवीने कडू असणारं कारलं शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. मात्र केवळ चव कडू असल्यामुळे ते खाण्यासाठी टाळाटाळ केली जाते. विशेष म्हणजे कारलं लहान मुलांनी खावं यासाठी गृहिणी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. बऱ्याच वेळा कारल्याचा कडूपणा जावा यासाठी महिला कारली चिरल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवतात आणि त्यानंतर कारल्याला सुटलेलं पाणी टाकून देतात. परंतु असं केल्यामुळे भाजीतील जीवनसत्त्व पूर्णपणे वाया जाते. कारल्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. त्यामुळे कारलं कितीही नावडतं असलं तरी आहारात आठवड्यातून किमान एकदा तरी या जेवणात याचा समावेश करावा.

कारल्याचे फायदे –

१. कारल्याच्या रसामुळे रक्तशुद्ध होते. त्यामुळे त्वचा विकार होण्याचा धोका कमी होतो.

२. कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो सकाळ, संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते.

३. यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस फायदेशीर असतो.

४. पोटात जंत झाल्यास कारल्याचा रस फायदेशीर ठरतो. पोटात कृमी किंवा जंत झाल्यास कारल्याचा रस प्यावा.

५. दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे त्रास दूर होतात.

६. कारले हे शक्तीवर्धक आहे म्हणून लहानमुलांच्या आहारातही कारल्याचा समावेश आवर्जून करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 3:51 pm

Web Title: health benefits of bitter gourd in marathi ssj 93
Next Stories
1 एअरटेल-जिओचा ‘जुगाड’, एकमेकांचे ग्राहक तोडण्यासाठी 100-100 रुपयांचं ‘बक्षिस’
2 Netflix साठी द्यावे लागणार 50% पर्यंत कमी पैसे , कंपनी आणणार तीन नवे प्लॅन
3 HERO च्या स्कुटर-बाइक महागणार, किती वाढली किंमत?
Just Now!
X