सुकामेवा म्हटलं की डोळ्यासमोर काजू,बदाम, पिस्ता, मणुके असे ना-ना विविध पदार्थ डोळ्यासमोर येतात. या सुक्यामेव्यामध्ये इतर पदार्थांच्या तुलनेत काजू आवडीने खाल्ले जातात. मात्र, अनेकदा काजू जास्त खाल्ल्याने पोटदुखी होईल, पित्त वाढेल असं म्हटलं जातं. काही अंशी ते योग्य जरी असलं तरीदेखील काजू खाण्याचे अन्य फायदेखील आहेत. परंतु, कोणत्याही पदार्थाचा अतिरेक करुन नये म्हणतात, त्याचप्रमाणे काजूदेखील जास्त प्रमाणात न खाता मोजून-मापून खाल्ले तर त्याचा शरीरासाठी नक्कीच फायदा होईल. त्यामुळे काजू खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

काजू खाण्याचे फायदे

cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Francis Scott Key Bridge in Baltimore
जहाजाची धडक अन् नदीवरील ब्रिज पत्त्यासारखा कोसळला, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

१. काजू खाल्ल्यामुळे शरीरातील ताकद वाढते.

२. एकाग्रता वाढते.

३. स्मरणशक्ती चांगली होते.

४. मासिक पाळीच्या काळात अनेक स्त्रियांचे मूडस्विंग होतात, त्यावेळी काजू खाल्यास फायदा होतो.

५. डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास रोज सकाळी उपाशी पोटी ४ काजू खावेत. त्यावर एक चमच मध खावा. यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो.

६. रक्ताभिसरण सुरळीत होतं.

७. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

८. अशक्तपणा दूर होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)