27 January 2021

News Flash

रात्रीचे जेवण लवकर करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

जीवनशैली सुधारण्यात मदत

उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक असते हे जरी खरे असले तरीही या जेवण्याच्या वेळाही योग्य असायला हव्यात. एखादवेळी दिवसा तुम्ही कोणत्याही वेळेला खाल्लेले चालू शकेल पण रात्रीचे जेवण मात्र झोपण्याच्या आधी ३ ते ४ तास आधीच व्हायला हवे. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहतेच पण चांगली झोप येण्यासही त्याचा उपयोग होतो. अशाप्रकारे जेवण्याच्या काही तास खाल्ल्यास खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. याचा आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे रात्री उशीरा जेवण करण्याची सवय आरोग्यासाठी निश्चितच घातक ठरु शकते. त्यामुळे पचनाच्या तक्रारी, लठ्ठपणा असे त्रास उद्भवतात. पाहूयात रात्री लवकर जेवण्याचे आरोग्याला होणारे फायदे…

वजन नियंत्रणात राहण्यास मदत

सध्या विविध कारणांनी वाढणारे वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. बैठी जीवनशैली, कामाचा ताण आणि इतर अनेक कारणे लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतात. पण रात्रीचे जेवण लवकर केल्यास लठ्ठपणाची समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. तसेच रात्रीचे जेवण केल्यावर शतपावली करणेही अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे रात्रीच्या वेळीही तुम्ही पोटभर खाल्ले तरीही लवकर खाल्ल्याने वजन वाढणार नाही.

ऊर्जा टिकून राहण्यास मदत

रात्री खूप जास्ती पोटभर खाल्ले तर दुसऱ्या दिवशी उठल्यावर तुम्ही नीट नाश्ता करु शकत नाही. हा नाश्ता नीट झाला नाही तर दिवसभर तुम्हाला अंगात ताकद नसल्यासारखे वाटत राहते. पण हेच जर तुम्ही रात्रीचे जेवण लवकर केले असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित भूक लागते आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता.

पचनक्रीया सुधारण्यास मदत

तुम्ही रात्री लवकर जेवण केले तर ते अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे पोट गच्च न वाटता झोपण्याच्या वेळेला पोट काही प्रमाणात हलके झालेले असते. तसेच ज्यांना गॅसेसचा त्रास असतो तोही जेवणानंतर झोपेपर्यंत पुरेसा वेळ मिळाल्यास कमी होतो. पण रात्री उशीरा जेवल्यास रात्रीत अन्न नीट पचत नाही आणि ते आरोग्यासाठी चांगले नसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 1:44 pm

Web Title: health benefits of consuming dinner early in the evening
Next Stories
1 आंबे खरेदी करताय? हे नक्की वाचा
2 कर्करोगावरील नवे औषध मुलांसाठीही सुरक्षित
3 वयानुसार आहारात ‘हे’ बदल करा
Just Now!
X