शरीराच्या योग्य वाढीसाठी सकस आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या आहारात कायम पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करायला हवा. प्रत्येक भाजीमध्ये खास गुणधर्म असतात. त्यामुळे या भाज्या खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. साधारणपणे बटाटा, भेंडी,टोमॅटो या भाज्या आवडीने खाल्ल्या जातात.मात्र, कोबी, फ्लॉवर,मेथी या भाज्या खाणं अनेक जण टाळतात. परंतु, या भाज्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असून फ्लॉवर खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. रक्त शुद्ध होते.

२. पोटासंबंधीत तक्रारी दूर होतात.

३. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

४. सांधेदुखीची समस्या कमी होते.

५. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता भरुन निघते.

६. वजन नियंत्रणात राहते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)