04 December 2020

News Flash

मक्याचे कणीस खाण्याचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?

जाणून घ्या, मक्याचे कणीस खाण्याचे फायदे

पावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची रेलचेल सुरु होते. हिरवट-पिवळस सालं असलेली मक्याची कणसं अनेकांची लक्ष वेधून घेतात. धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे खासकरुन पावसाळ्यात मक्याच्या कणसांना जास्त मागणी असते. परंतु, सध्याच्या काळात बाराही महिने ही कणीस सहज उपलब्ध होत असतात. त्यामुळे अनेक गृहिणी त्यापासून विविध पदार्थ करताना दिसतात. विशेष म्हणजे ही कणीस खाण्याचे काही फायदे आहेत. त्यामुळे चला तर मग आज जाणून घेऊयात मक्याचे कणीस खाण्याचे काही फायदे.

१. मक्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी आणि खासकरुन वृद्धांसाठी मक्याचं कणीस फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आजकाल बाजारात या कणिसांचे दाणे सोलूनदेखील मिळतात.

२. मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणे उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.

३. मक्याकडे अँटी-ऑक्सीडेंट म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्या सेवनाने जवळपास शरीरातील अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढते.

४. मक्याच्या सेवनामुळे वाढत्या वयाच्या खूणा कमी होतात.

५. मक्यात असलेल्या फॉलिक अॅसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी असतो.

६. मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते.

७. मक्याच्या पिठापासून तयार केलेली पोळीदेखील शरीरासाठी फायदेशीर आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 8:00 am

Web Title: health benefits of eating corn in monsoon ssj 93
टॅग Lifestyle
Next Stories
1 Recipe: रात्री उरलेल्या भाताच्या बनवा कुरकुरीत ‘भातोडया’
2 Jio ने पुन्हा आणली ‘ती’ ऑफर, ‘फ्री’मध्ये मिळतोय 2GB एक्स्ट्रा डेटा
3 फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी खाताय? सावधान!
Just Now!
X