News Flash

बहुगुणी जायफळ; जाणून घ्या ‘हे’ ८ फायदे

जाणून घ्या, जायफळ खाण्याचे फायदे

पुरणाची पोळी असो किंवा कोणताही गोड पदार्थ त्यात चिमुटभर जायफळाची पूड घातली की पदार्थाची चव चांगलीच वाढते. तसंच त्या पदार्थाचा सुवासदेखील घरभर पसरतो. त्यामुळे अनेक घरांमध्ये गृहिणी गोडाच्या पदार्थामध्ये जायफळ आवर्जुन घालतात. परंतु, जायफळ केवळ गोडाच्याच पदार्थांसाठीच वापरला जात नसून त्याचे अन्यदेखील फायदे आहेत. जायफळामुळे अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात. त्यामुळे जायफळ खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. पचनक्रिया सुरळीत होते.

२. आतड्यांच्या तक्रारी दूर होतात.

३. कफविकारामध्ये उपयोगी.

४.तोंडाची दुर्गंधी दूर होते.

५. भूक वाढते.

६.जुलाब, पोटात मुरडा येणे या समस्यांवर गुणकारी

७. शांत झोप लागते.

८. गोडाचे पदार्थ पचण्यास मदत होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 5:05 pm

Web Title: health benefits of eating nutmeg ssj 93
Next Stories
1 4G डाउनलोड स्पीडमध्ये Reliance Jio पुन्हा अव्वल, पण अपलोड स्पीडमध्ये…
2 पाच कॅमेऱ्यांसह 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी; लाँच झाला ‘शाओमी’चा बजेट स्मार्टफोन; किंमत फक्त…
3 मराठी नेटकऱ्यांसाठी खुशखबर: इंग्रजी टाइप केलं तरी गुगल देणार मराठी रिझल्ट
Just Now!
X