24 October 2019

News Flash

शेंगदाणे खाणे आरोग्यास फायद्याचे

प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले शेंगदाणे पित्तक्षामक आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे आहारात महत्त्व आहे.

| September 15, 2014 06:16 am

प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले शेंगदाणे पित्तक्षामक आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे आहारात महत्त्व आहे.
आतड्याचा(बृहदांत्र)कर्करोग टाळण्यासाठी:
आतड्याचा(बृहदांत्र)कर्करोग टाळण्यासाठी शेंगदाणे महत्त्वाची भूमिका बजावतात. शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले फॉलिक अॅसिड, फायटोस्टोरॉन, रेझव्हर्टरॉल आणि फायरीक अॅसिड हे कर्करोग विरोधी असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा मुठभर कच्चे शेंगदाणे खाणे कधीही फायदेशीर ठरते. त्यामुळे आतड्याचा कर्करोग २७ टक्क्यांपर्यंत टाळतो येतो. हे घटक असलेली औषधे खरेदी करण्यासाठी मात्र, मोठी रक्कम मोजावी लागते.     
हृदयाचा मित्र:
शेंगदाणे हा उपकारक अशा अँटीऑक्सीडंटचा मोठा स्त्रोत आहे. हृदयाच्या कार्यात सातत्य ठेवण्यासाठी आणि हृदयाला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी हे अँटीऑक्सीडंट महत्त्वाचे ठरतात.  
 स्मरणशक्ती वाढवण्यास मदत:
जीवनसत्व बी ३चा स्त्रोत असलेले शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज मुठभर शेंगदाणे खाण्यास काही हरकत नाही.

First Published on September 15, 2014 6:16 am

Web Title: health benefits of groundnuts