News Flash

जाणून घ्या, शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ तीन महत्त्वाचे फायदे

शेंगदाणे खाण्याचे गुणकारी फायदे

आपल्या आहारात जसे पिष्टमय पदार्थ, तंतूमय पदार्थ गरजेचे असतात. त्याचप्रमाणे आहारात स्निग्ध पदार्थांचा समावेश करणंही गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या आहारात तेलयुक्त बिया, शेंगदाणे असे स्निग्धांश असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. परंतु, अनेक वेळा शेंगदाणे खाल्ल्यामुळे पित्त वाढतं किंवा अन्य शारीरिक तक्रारी होतात असं म्हटलं जातं. मात्र असं असलं तरीदेखील शेंगदाणे आरोग्यासाठी तितकेच गरजेचे आहेत.

१. हृदयाला संसर्गापासून ठेवतो दूर –
शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सीडंट असतात. त्यामुळे हृदयाचं कार्य सातत्याने सुरळीत ठेवण्यासाठी आणि हृदयाला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी या अँटीऑक्सीडंट फायदा होतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी शेंगदाण्यांचं सेवन करणं कधीही फायदेशीर ठरतं.

२. आतड्यांचा कर्करोग होत नाही –
आतड्यांचा कर्करोग टाळण्यासाठी शेंगदाणे महत्त्वाची भूमिका बजावतात. शेंगदाण्यांमध्ये फॉलिक अॅसिड, फायटोस्टोरॉन, रेझव्हर्टरॉल आणि फायरीक अॅसिड असते. विशेष म्हणजे हे कर्करोग विरोध असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आठवड्यातून २ वेळा मुठभर कच्चे शेंगदाणे खावेत. त्यामुळे आतड्याचा कर्करोग २७ टक्क्यांपर्यंत टाळतो येतो.

३. स्मरणशक्ती वाढवण्यास मदत:
जीवनसत्व बी ३चा स्त्रोत असलेले शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज मुठभर शेंगदाणे खाण्यास काही हरकत नाही.

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 4:04 pm

Web Title: health benefits of groundnuts ssj 93
Next Stories
1 हळद घालून कोमट पाणी प्यायल्यास ‘या’ शारीरिक तक्रारी होतील दूर
2 बॅन केलेल्या 47 चिनी अ‍ॅप्समध्ये बहुतांश ‘क्लोन’, फक्त 15 नवीन अ‍ॅप्स
3 टीव्हीएस Apache च्या किंमतीत झाला बदल, जाणून घ्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Just Now!
X