आपल्यातील बहुतांश जण दैनंदिन जीवनात खूप व्यस्त असतात. त्यामुळे व्यायामाला वेळ होत नाही असे कारणही अनेक जण देतात. पण योगासनातील काही प्रकार करणे आरोग्यासाठी अतिशय हितकारक असते. त्यामुळे किमान शिर्षासन तरी रोज करायलाच हवे. यामुळे डोक्याकडे रक्तपुरवठा होण्यास मदत होते हे एक कारण आपल्याला माहित असते. मात्र त्याशिवायही शिर्षासनाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो

speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

डोके खाली केल्याने डोक्याकडे म्हणजेच मेंदूकडे चांगला रक्तपुरवठा होतो. तसेच या स्थितीमुळे मेंदूला ऑक्सिजनचाही चांगला पुरवठा होतो. शिर्षासनात सगळ्या गोष्टी डोक्याकडे केंद्रित होत असल्याने ते आरोग्याच्यादृष्टीने चांगले ठरते. साधारणपणे हृदय सतत मेंदूला रक्तपुरवठा करत असते. पण शिर्षासनामुळे हृदयाला आवश्यक असणारा ब्रेक मिळतो. यामध्ये रक्त वेगाने मेंदूकडे जाईल असे कदाचित तुम्हाला वाटू शकते, पण याची आवश्यकता असते.

लक्ष केंद्रित करण्यासाठी उपयुक्त

शिर्षासनात रक्त आणि ऑक्सिजनचा मेंदूकडे पुरवठा होत असल्याने तुमचे लक्ष नकळत केंद्रित होण्यास मदत होते. सुरुवातीला ५ ते ८ सेकंद हे लक्ष केंद्रित करणे काहीसे अवघड जाते. मात्र नंतर तुम्ही अगदी सहज आणि चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करु शकता तसेच यामुळे तुमची मानसिक स्थिती सुधारण्यासही मदत होते.

खांदे आणि दंड मजबूत होण्यास मदत

शिर्षासनात सर्व वजन हे खांदे आणि दंडावर येते. त्यामुळे हाताच्या नसांवर ताण येतो. त्यामुळे ते मजबूत होण्यास मदत होते. आपण मुद्दाम खांदे आणि दंडाचे व्यायाम करत नाही. पण या व्यायामप्रकारात नकळत त्यांचा व्यायाम होतो. इतकेच नाही तर तुमचा कोअरही बळकट होण्यास मदत होते.

केसांचे आरोग्यही सुधारते

सध्या अनेक महिला आणि पुरुषांनाही केसांबाबत अनेक तक्रारी असतात. केस गळणे, त्यामुळे पडणारे टक्कल, केस पांढरे होणे यांसारख्या समस्या अनेकांना असतात. रक्ताचा पुरवठा डोक्याच्या बाजुने होत असल्याने केसांची मुळे बळकट होण्यास मदत होते. त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.