22 October 2020

News Flash

केळफूल खाण्याचे ‘हे’ ६ गुणकारी फायदे माहित आहेत का?

जाणून घ्या, केळफूल खाण्याचे फायदे

कोणत्याही फळांमध्ये बी ही असतेच असते. मात्र, केळं हे असं एकमेव फळ आहे, ज्यात बी नसते. त्यामुळे सर्वात जुनं बिनबियांचं फळ म्हणून केळं ओळखलं जातं. केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसंच केळ्यापासून वेफर्स, केळ्याची कोथिंबीर, शिकरणं असे अनेक पदार्थ केले जातात. यासोबतच केळी खाण्याचे अनेक शारीरिक फायदेदेखील आहेत. साधारणपणे केळी खाण्याचे फायदे साऱ्यांनाच ठावूक असतील. मात्र, त्याच्या इतकीच त्याची फूले म्हणजेच केळफुलदेखील तितकंच गुणकारी आहे. त्यामुळे केळफूल खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

केळफुलाचे फायदे

१. केळफूलाची भाजी ही अत्यंत पौष्टिक व सकस आहार आहे. त्यामुळे लहान मुलांनी आवर्जुन ही भाजी द्यावी.

२. केळफुलामुळे गर्भाशयाच्या तक्रारी दूर होतात.

३. केळफुलामुळे हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते.

४. मासिक पाळीच्या काळात अति रक्तस्राव होत असल्यास केळफुलाची भाजी खावी.

५. मासिक पाळीतील वेदनादेखील दूर होतात.

६. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 5:51 pm

Web Title: health benefits of kelful or banana flower ssj 93
Next Stories
1 IRCTC सोबत करा दक्षिण भारताची सैर, या ठिकाणी फिरण्याची संधी
2 हिरड्यांमधून रक्तस्त्राव का होतो माहित आहे का?
3 तुम्हाला संधिवात आहे? मग जाणून घ्या ‘या’ उपचाराबद्दल
Just Now!
X