News Flash

जाणून घ्या, लाल भोपळा खाण्याचे ‘हे’ ५ गुणकारी फायदे

भोपळा खाण्याचे गुणकारी फायदे

नावडतीच्या भाजांमधील एक भाजी म्हणजे लाल भोपळा. अनेक ठिकाणी याला डांगर किंवा तांबडा भोपळा असं म्हणतात. चवीला गोडसर आणि पटकन शिजणारी ही भाजी अनेकांना आवडत नाही. त्यामुळे अनेक जण भोपळ्याची भाजी पाहिल्यावर नाक मुरडतात. परंतु, ही भाजी शरीरासाठी गुणकारी असून त्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात भोपळा खाण्याचे फायदे –

१. वजन कमी करणे –
अनेक जण वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा व्यक्तींनी भोपळ्याची भाजी खावी. भोपळ्यामध्ये कमी कॅलरीज असतात. तसंच त्यात मोठ्या प्रमाणावर फायबरचं प्रमाण असतं त्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होतात आणि भूकेवर नियंत्रण मिळते.

२. पचनक्रिया सुधारते –
भोपळ्याचं नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील फायबरची क्षमता ११ टक्क्यांनी वाढते. त्यामुळे पचनमार्गात येणारे अडथळे दूर होतात. तसंच बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो.

३. डोळ्यांचे आरोग्य सुधारते –
भोपळ्याच्या सेवनामुळे मोतीबिंदूची समस्या दूर होण्यास मदत होते. डोळ्याचे स्नायू अशक्त असल्यास भोपळा गुणकारी ठरतो.

४. रोगप्रतिकारक शक्ती वाढते –
भोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

५. मधुमेहींसाठी गुणकारी –
भोपळा चवीला गोड असला तरीदेखील भोपळ्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 4:03 pm

Web Title: health benefits of pumpkin ssj 93
Next Stories
1 Jio चे 400 पेक्षा कमी किंमतीचे दोन भन्नाट प्लॅन, मिळेल 84GB डेटा
2 पुणे, नाशिक, साताऱ्यातील विषाणूचे युरोपमधील करोनाशी साधर्म्य
3 कडीपत्त्याचे ‘हे’ १७ फायदे तुम्हाला माहितीयेत?
Just Now!
X