शरीरावर टॅटू गोंदवून अथवा रंगवून घेण्याची सध्याच्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येते. आवड म्हणून अनेक जण टॅटू काढून घेताना दिसतात. विशेष म्हणजे काही जण शरीरावर असलेले डाग लपविण्यासाठीदेखील टॅटूचा पर्याय अवलंबतात. मात्र फॅशन म्हणून टॅटू गोंदवून घेत असताना काही गोष्टींची खबरदारी बाळगण्याची आवश्यकता असते. अनेक वेळा टॅटू काढल्यानंतर नीट काळजी न घेतल्यामुळे त्वचेशी संबंधित तक्रारी निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी टॅटू काढल्यानंतर विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

१. टॅटू काढलेल्या ठिकाणी खाज येणे –
टॅटू काढल्यानंतर ज्या ठिकाणी टॅटू काढला आहे तो भाग सेंसेटिव्ह झाला असतो. त्यासोबतच टॅटू काढताना वापरण्यात आलेली शाईदेखील सुकण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. ही शाई सुकू लागली की त्या ठिकाणची खपली निघू लागते आणि टॅटू काढल्याच्या ठिकाणी खाज सुटू लागते. मात्र टॅटूची शाई पूर्णपणे वाळल्यानंतर ही खाजही बंद होते. मात्र जर काही ठराविक वेळेनंतरही ही खाज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अशा परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

२. टॅटू काढलेल्या ठिकाणातून पू येणे –
टॅटू कधीही प्रशिक्षित टॅटू आर्टिस्टकडूनच काढून घ्यावा.त्यामुळे टॅटू काढल्यानंतर समस्या निर्माण होत नाहीत. अनेक वेळा टॅटू काढतांना जखम निर्माण होते. परिणामी, ही जखमी पिकते आणि त्या ठिकाणाहून पू येऊ लागतो. हा पू जखमेच्या आतही असतो त्यामुळे या जागेवर ठणका लागलं, सतत दुखणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे वेळीच या गोष्टीकडे लक्ष द्या.

३. उग्रवास –
टॅटू काढल्यानंतर अनेक वेळा त्या ठिकाणाहून उग्र दर्प येतो. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जर टॅटू काढलेल्या ठिकाणाहून असा उग्र वास येत असेल तर तुम्हाला इन्फेक्शन झालं आहे असं समजावं. अशा परिस्थितीत कोणतेही घरगुती उपाय न करता थेट डॉक्टरांकडे जावं.

४. सतत दुखणे-
टॅटू काढल्यानंतर अनेक वेळा तो भाग दुखत असतो. मात्र हा भाग काही ठराविक काळापर्यंत दुखतो. या ठराविक काळानंतरही हे दुखणं सुरु असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

५. टॅटू काढलेला भाग लाल होणे –
आपली त्वचा ही सेन्सेटिव्ह असते. त्यामुळे त्वचेवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम लवकर होतो. टॅटू काढल्यानंतर अनेक वेळा तो भाग लाल होतो. मात्र जर हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असेल तर ते घातक ठरू शकतं.

दरम्यान, टॅटू काढल्यानंतर कायम स्वच्छतेची आणि सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. टॅटू नवीन असताना त्या ठिकाणी कॉटन आणि सुईसारखे टोकदार वस्तूंचा स्पर्श करु नये. त्यासोबतच त्या भागाची विशेष काळजी घ्यावी. आणि टॅटू काढलेल्या ठिकाणी काही दिवस खोबऱ्याचं तेल किंवा बेबी ऑईल लावत रहावे.