News Flash

धूम्रपान करत असाल तर विम्याचा विचार कराच कारण…; तज्ज्ञांचा सल्ला

तंबाखूला म्हणा नो, आणि आरोग्य विम्यास म्हणा हो

– धिरेंद्र मह्यावंशी

कोविड १९ची साथ पसरली असताना जगभरातील लोक दैनंदिन व्यायाम किंवा दैनंदिन विधीप्रमाणे प्राणायाम करून आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देत आहेत. या साथीने आपल्याला नक्कीच चकित केले आहे. परंतु जे लोक आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत किंवा जे लोक धूम्रपान न करणारे आहेत ते ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहेत.   जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रथमच असे म्हटले आहे की तंबाखूचा वापर करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत घट होत आहे. जो एक महत्वपूर्ण बदल आहे. डब्ल्यूएचओने डिसेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या दोन दशकांत एकूण जागतिक तंबाखू वापराचा आकडा २००० मधील १.३९७ अब्जच्या तुलनेने २०१९ मध्ये १.३३७ अब्जांवर आला आहे. आरोग्य प्रथम दृष्टिकोन अधोरेखित करणारी ही एक अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. तंबाखूचे सेवन सोडणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे, त्याहूनही दुसरी चांगली बाब म्हणजे गंभीर आजाराचा विमा किंवा कॅन्सर विमा पॉलिसी खरेदी करणे.

धूम्रपान करणार्‍यांनी आणि धूम्रपान सोडलेल्यांनी गंभीर आजाराचा विमा किंवा कॅन्सर विमा का खरेदी करावा ?

जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुम्ही ही हानिकारक सवय सोडण्याचा निश्चय तर करावाच, कारण आपल्याला हे देखील समजले पाहिजे की धूम्रपान करणार्‍यांना कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. अशा प्रकारे, धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करण्या सोबतच आपण गंभीर आजाराची विमा पॉलिसी किंवा कॅन्सर विमा पॉलिसी खरेदी करण्याचा विचार देखील करावा. कॅन्सरचा उपचार एखाद्या व्यक्तीवर भावनिक आणि आर्थिक ओझे बनू शकतो. कॅन्सर किंवा इतर अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्याची किंमत खूप जास्त असू शकते. आपल्याला या आजारामुळे आपले काम कमी करावे लागू शकते, अथवा कामापासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घ्यावी लागू शकते, ज्यामुळे आपणाला एका कठिण परिस्थितीला सामोरे जावे लागते, जिथे आपले मासिक खर्च वाढू लागतात आणि आपले मासिक उत्पन्न कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत, गंभीर आजाराचा विमा किंवा कॅन्सर विमा पॉलिसी आपल्या बचावासाठी येऊ शकते. पॉलिसीच्या प्रकारानुसार आपण निदान झाल्यावर एकरकमी पेमेंट मिळवू शकता आणि रोगाच्या उपचारासाठी कव्हर देखील मिळवू शकता. अशा प्रकारे, आवश्यकत्येच्या वेळी योग्य विमा पॉलिसी एखाद्या गंभीर आजाराचा काही आर्थिक भार कमी करण्यास मदत करते.

आपण कोणत्या प्रकारचा विमा निवडावा ?

एक सर्वसमावेशक आरोग्य विमा किंवा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना व्यापणारी फ्लोटर पॉलिसी वैद्यकीय रोगांच्या अनेक व्याप्तींसाठी संरक्षण प्रदान करू शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक आरोग्य विमा कॅन्सरसह जवळजवळ सर्व गंभीर आजारांना कव्हर देतात. पण, या धोरणांद्वारे प्रदान केलेले विमा संरक्षण सामान्यत: अनेक उप मर्यादांच्या अधीन असते, ज्यामुळे विविध गंभीर आजारांसाठी देय एका ठराविक रकमेपर्यंत मर्यादित होते. या आरोग्य विमा योजनांमध्ये सामान्यत: फक्त रूग्णालयात दाखल झालेले असल्यावर कव्हर मिळते. या विमा योजनांमध्ये क्वचितच उपचारांचा संपूर्ण खर्च भागवला जातो, जेव्हा गंभीर आजारांचा विचार केला जातो तेव्हा आपणास अशा विमा पॉलिसीची आवश्यकता असते ज्यात या रोगांचा विशेष समावेश असेल. अशा परिस्थितीत आपल्याकडे दोन पर्याय आहेत, आपण गंभीर आजाराची विमा पॉलिसी किंवा कॅन्सर विमा पॉलिसी खरेदी करू शकता.

एक गंभीर आजार विम्यामध्ये विमाधारकास कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या अनेक गंभीर आजारांविरूद्ध कव्हर केले जाते. पॉलिसी गंभीर आजाराचे निदान करताना एकरकमी देय देईल, पण, तो आजार विम्याच्या गंभीर आजार कव्हर यादीमध्ये असणे आवश्यक आहे.

( लेखक टर्टलमिंट इंश्योरटेक कंपनीचे सह-संस्थापक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 3:10 pm

Web Title: health insurance how a smoker can buy health insurance nck 90
Next Stories
1 ‘फ्लिपकार्ट’ने लाँच केली नवी सेवा, आता लहान मुलांच्या फर्निचर क्षेत्रात एंट्री
2 काही सेकंदातच झाला ‘सोल्ड आउट’, पहिल्या सेलमध्ये OnePlus 8 Pro ला शानदार प्रतिसाद
3 टिकटॉक वापरताना या १० गोष्टी कायम लक्षात ठेवा
Just Now!
X