06 March 2021

News Flash

केसांच्या सौंदर्यापासून ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यापर्यंत सोयाबीन खाण्याचे १० फायदे

जाणून घ्या, सोयाबीन खाण्याचे फायदे

कडधान्य, पालेभाज्या, डाळी यांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक फायदे साऱ्यांनाच ठाऊक आहेत. परंतु, सोयाबीन हादेखील असाच एक पदार्थ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक शाकाहारी लोकं सोयाबीनची भाजी आवडीने खातात. तर, महिलादेखील गहू किंवा अन्य धान्यांमध्ये सोयाबीन टाकून त्याचं पीठ करुन आणतात. सोयाबीनच्या सेवनाने अनेक शारीरिक व्याधी दूर होत असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे सोयाबीनच्या बी प्रमाणेच त्याची अन्य उत्पादनांचादेखील शरीरासाठी तितकाच फायदा होतो. इतकंच नाही तर अलिकडे पाहायला गेलं तर सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोयाबडी (सोया नगेट) दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने (उदा. ब्रेड, बिस्किटे) व डाळीचे पदार्थ (उदा. नमकीन) यांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं पाहायला मिळतं. चला तर मग पाहुयात सोयाबीन खाण्याचे फायदे.

१. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सोयाबीन गुणकारी आहे.

२. हडांना बळकटी देण्यासाठी आणि मजबूती वाढविण्यासाठी सोयाबीन फायदेशीर आहे.

३. हृदयासंबंधित आजार दूर ठेवते.

४. वजन नियंत्रणात राहते.

६. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

७. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

८. निद्रानाश दूर होतो.

९. केसांची वाढ होते.

१०. त्वचेचा पोत सुधारतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 5:17 pm

Web Title: health news 10 benefits of soybean ssj 93
Next Stories
1 कोबी खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे माहित आहे का?
2 फक्त दोन मिनिटांत 1.5 लाखांहून जास्त विक्री, रिअलमीच्या ‘स्वस्त’ फोनला जबरदस्त प्रतिसाद
3 PUBG Mobile Lite ला झालं एक वर्ष, नवीन बंदुकांसह मॅपही झाला अपडेट
Just Now!
X