26 February 2021

News Flash

‘या’ शारीरिक समस्यांनी त्रस्त आहात? मग आहारात करा सीताफळाचा समावेश

सीताफळ खाण्याचे फायदे

सुदृढ आणि निरोगी आरोग्य हवं असेल तर आहारात फळे आणि कडधान्यांचा आवर्जुन समावेश केला पाहिजे. अनेकदा डॉक्टरदेखील लहान मुलांना किंवा वयस्क व्यक्तींना फळे खाण्याचा सल्ला देतात. परंतु, अनेक जण फळं खाण्यास कंटाळा करतात. मात्र, फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असण्यासोबतच काही गुणकारी गुणधर्मदेखील असतात. त्यामुळे आज सीताफळ खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

सीताफळ खाण्याचे फायदे

१. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर होते.

२. रक्ताचे प्रमाण वाढते.

३. अशक्तपणा दूर होतो.

४. वजन वाढते.

५. हृदयासाठी फायदेशीर

६. छाती किंवा पोटात जळजळ होत असल्यास दूर होते.

७. उष्णतेचे विकार दूर होतात.

८. अपचन, अरुची दूर होते.

९. सीताफळाच्या बिया वाटून केसांना लावल्यास डोक्यातील उवा मरतात.

या काळात सीताफळ खाऊ नये

१. सर्दी-खोकला झाल्यास सीताफळ खाऊ नये.

२. जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढते.

३. सीताफळाच्या बियांची पूड केसांना लावतांना काळजी घ्यावी. डोळ्यात गेल्यास डोळ्याचे विकार होण्याची शक्यता असते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 2:57 pm

Web Title: health news benefits of eating custard apple ssj 93
Next Stories
1 FB चा मोठा दणका; ऑस्‍ट्रेलियात न्‍यूज सर्व्हिस केली बॅन, स्वतःचं पेजही केलं ब्‍लॉक
2 काय? फोटोत दिसणारी ‘ही’ व्यक्ती पुरुष नाही…मग? ; जाणून घ्या फोटोमागील सत्य
3 मॅग्नाईट.. खडतर मार्गावरही सुसाट
Just Now!
X