आई होणं ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे असं म्हटलं जातं. एका नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे घरातील संपूर्ण वातावरण बदलून जातं. घरात आनंद, उत्साह, चैतन्याचं वातावरण असलं तरीदेखील स्त्रिया अनेक वेळा उदास किंवा एकटा असल्याचं जाणवतं. मात्र कोणतीही स्त्री हे मुद्दाम करत नसते. बाळ येण्याचा आनंद तिलादेखील तितकाच असतो. मात्र काही वेळा अंगावर पडलेली ही जबाबदारी पाहून स्त्रिया नैराश्यात जातात.

दरम्यान, अनेक घरांमध्ये प्रसुतीनंतर स्त्रिया नैराश्यात गेल्याचं पाहायला मिळतं. यात तिच्या स्वभावातील चिडचिड, राग यांचं प्रमण वाढलं असतं. तसंच काही वेळा ती शांत-शांतही बसलेली असते. त्यामुळे या प्रसंगात स्त्रियांनी नवऱ्याने आणि कुटुंबीयांनी सांभाळून घेणं गरजेचं आहे.