मीठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही असं कायम म्हटलं जातं. एकाअर्थी ते खरं देखील आहे. पदार्थ कोणताही असला तरी मीठामुळे त्याची चव वाढते. मीठ पदार्थाची चव जरी वाढवत असलं तरीदेखील ते अतिप्रमाणात खालल्यामुळे त्याचे तोटेदेखील तितकेच आहेत. अनेकांना जेवताना जास्त मीठ घेण्याची सवय असते.मात्र, जास्त मीठामुळे शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे मीठाचं अतिप्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी कसं घातक आहे ते पाहुयात.

अतिप्रमाणात मीठाचे सेवन करण्याचे दुष्परिणाम

१. लठ्ठपणा

२. स्मृतिभ्रंश

३. किडनीसंबंधीत आजार होण्याची शक्यता.

४. रक्तदाबाशी संबंधित समस्या.

५. हृदयविकार होण्याची शक्यता.

६. झोपेचे विकार

७. मधुमेह

दरम्यान, मीठाचं अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरासंबंधित अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही पदार्थाचं प्रमाणात सेवन करावं असं डॉक्टर वारंवार सांगताना दिसतात.