News Flash

देशातील आरोग्य क्षेत्रातील संशोधनात गुंतवणुकीची गरज

इंडियन सोसायटी फॉर क्लिनिकल रिचर्स

देशातील आरोग्य क्षेत्रातील संशोधनात गुंतवणुकीची गरज

देशातील आजारांचे प्रमाण पाहता आरोग्य क्षेत्रातील संशोधनांवर अधिक गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे मत इंडियन सोसायटी फॉर क्लिनिकल रिचर्स (आयएससीआर)ने व्यक्त केले आहे.

या संदर्भात सर्वच घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज संस्थेने व्यक्त केली असून, संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण केले जावे अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. आरोग्यविषयक संशोधनाचे लाभ केवळ रुग्णांपुरतेच नव्हे तर समाजाला मिळावेत त्या दृष्टीने जनजागृती व्हावी, अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष चिराग त्रिवेदी यांनी व्यक्त केली. दिल्लीतील १२ व्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते.

आजारांचे स्वरूप बदलत असल्याचा परिणाम भारतीय समाजावर होतो. विशेषत: जीवनशैलीशी निगडित व्याधी वाढत आहेत. त्यामुळे यावर संशोधन करणे, त्यासाठी मोठी गुंतवणूक करणे ही तातडीची गरज असल्याचे त्रिवेदी यांनी स्पष्ट केले. या परिषदेत देशभरातील ५०० संशोधक सहभागी झाले होते. भारतात वैद्यकीय संशोधनाबाबत नियम कठोर आहेत. त्यामुळे त्यात अडथळे येतात. अशा परिस्थितीत संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे, असे मेदांताचे वरिष्ठ संचालक संजय मित्तल यांनी सांगितले.

संशोधनाला अनुकूल वातावरण तयार झाले तर आरोग्य क्षेत्राला लाभ होईल, अशी अपेक्षा त्रिवेदी यांनी व्यक्त केली, तसेच ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. दर्जेदार किफायतशीर व प्रभावी औषधे तयार करण्यास वचनबद्ध असल्याचे त्रिवेदी यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2019 12:04 am

Web Title: health sector need investment for research
Next Stories
1 सॅमसंगच्या भात्यातील नव्या टॅबचे भारतीय बाजारात आगमन….
2 आयफोन उशीराने अनलॉक होत असल्याने ग्राहकाची न्यायालयात धाव
3 कर्करोगाला रोखणारा औषधाचा रेणू शोधण्यात यश
Just Now!
X