कोबीमध्ये आरोग्यासाठी खूप फायदे लपलेले आहेत. त्यामुळे दररोजच्या आहारात कोबीला प्राधान्य दिले पाहिजे. कोबमध्ये ‘अ’ जीवनसत्व भरपूर असते. तसेच व्हिटॅमिन ‘सी’ जास्त आहे. पत्ताकोबी किंवा कोबी हा आरोग्यकारी आहेच, शिवाय त्यात उष्मांकांचे प्रमाण कमी असते. आपल्या आहारामध्ये कोबी असल्यास आतड्याचा कर्गरोग नियंत्रित राहू शकतो किंवा होण्याची शक्यता कमी राहते. इतर फळे आणि भाज्या यांच्या तुलनेत कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण अधिक असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पत्ताकोबीचे रोज सेवन केल्यास सी जीवनसत्त्वाची 50 टक्के गरज पूर्ण केली जाऊ शकते. तसेच के जीवनसत्त्वाची 100 टक्के गरज पूर्ण होते.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, लंडनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटमधील काही तज्ञांनी यावर संशोधन केले आहे. कोबीची भाजी आतड्याच्या कर्करोगावर उत्तम उपाय आहे. कोबीच्या भाजीमुळे आतड्याच्या कर्करोगावर प्रतिकार करणारे एक उत्तम औषध आहे. कोबीच्या भाजीमुळे शरिरातील प्रतिकारात्मक शक्ती वाढते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये कोबीच्या भाजीचा समावेश करावा.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी
Panvel water
‘पिण्यासाठी पाणी द्या, मग पाणी बचतीचा संदेश द्या’

कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो. कप होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चागले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.