News Flash

आम्लपित्ताच्या विकारावर गुणकारी असणाऱ्या खरबूजाचे ८ फायदे

जाणून घ्या, खरबूज खाण्याचे फायदे

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर आहारात पालेभाज्यांपासून ते फळांपर्यंत प्रत्येक घटकाचा समावेश केला आहे. पालेभाज्या, कडधान्य यांच्याप्रमाणेच फळांमध्येदेखील असे काही गुणधर्म असतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळेच बऱ्याचदा अशक्तपणा आल्यावर डॉक्टर काही ठराविक फळे खाण्याचा सल्ला देतात. साधारणपणे सफरचंद, चिकू, केळी, द्राक्ष ही फळे सर्रास घरात असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, या फळाव्यतिरिक्त खरबूज हे फळदेखील तितकंच गुणकारी आहे. त्यामुळे आहारात खरबूजाचा समावेश नक्कीच करायला हवा.

खरबूज खाण्याचे फायदे –
१. खरबूजमध्ये शीत गुणधर्म आहेत. त्यामुळे उष्णतेचे विकार होत असल्यास खरबूज खावं.

२. उन्हाळ्यात प्रक्रिया केलेले शीतपेय पिण्याऐवजी खरबूजाच्या रसाचे सेवन करावे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

३. खरबूज हे जुनाट मलावस्तंभ या आजारावर उपयुक्त आहे. खरबूज सेवनाने आतड्यातील घट्ट मळ पुढे सरकण्यास मदत होते.

४.अतिसार, आमांश या विकारांमध्ये खरबूज खाणे लाभदायक ठरते.

५. खरबूजामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन निघते.

६. आम्लपित्ताच्या विकारावर गुणकारी.

७. वजन वाढविण्यास मदत होते.

८. पचनक्रिया सुधारते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 3:46 pm

Web Title: health tips health benefits of muskmelon ssj 93
Next Stories
1 देशातील ‘बेस्ट सेलिंग स्कूटर’ झाली महाग, कंपनीने पुन्हा वाढवली किंमत
2 फक्त 78 रुपयांमध्ये दररोज 3GB डेटासह फ्री कॉलिंगही, BSNL चा शानदार प्लॅन
3 ‘होल-पंच’ डिस्प्लेसह ‘क्वॉड रिअर कॅमेरा’ सेटअप, किंमत 15 हजारांपेक्षा कमी; ‘या’ तारखेला सेल
Just Now!
X