आरोग्यदायी आहारामुळे महिलांमधील कर्णबधीरतेची जोखीम कमी होते, असे अभ्यासात दिसून आले आहे. अमेरिकेतील ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलमध्ये तीन प्रकारच्या आहारपद्धती व कर्णबधीरता यांच्या संबंधावर संशोधन करण्यात आले आहे. भूमध्य सागरी आहारातील (एएमइडी)  ७०९६६ महिलांच्या २२ वर्षांतील आहाराची नोंद यात तपासण्यात आली. या आहारात ऑलिव्ह तेल, धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दाणे, मासे व माफक अल्कोहोल यांचा समावेश आहे. डाएटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन (डॅश) व दी अल्टरनेटिव्ह हेल्दी इटिंग इंडेक्स २०१० या आणखी दोन आहारांचा संशोधनात समावेश करण्यात आला होता. डॅश आहारात  कमी मेद, फळे, भाज्या व कमी सोडियम यांचा समावेश आहे. जर्नल न्यूट्रीशनमध्ये प्रसिद्ध संशोधन अहवालानुसार आरोग्यदायी आहारामुळे महिलांमधील कर्णबधीरत्व कमी होते.

जे लोक आरोग्यदायी आहार घेतात त्यांच्यात कर्णबधीरतेची जोखीम कमी होत असल्याचा दावा ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलच्या श्ॉरॉन कुरहान यांनी केला आहे. चांगल्या आरोग्यात कर्णबधीरता नसण्याला महत्त्व आहे. संशोधकांच्या मते एमएइडी व डॅश आहारपद्धतीत कर्णबधीरत्वाचा धोका ३० टक्के कमी होतो. इतर आहारपद्धती वापरणाऱ्या महिलांच्या तुलनेत त्यांच्यात कर्णबधीरत्व कमी असते.

यात एकूण एएचइआय २०१० प्रकारच्या आहारात ही शक्यता आणखी ३० टक्के कमी होते असे ३३ हजार महिलांच्या अभ्यासातून दिसून आले आहे.