खावे नेटके
पल्लवी सावंत – response.lokprabha@expressindia.com

जंक फूडवर पोसल्या जाणाऱ्या आजच्या पिढीला आहाराअभावी अनेक शारीरिक समस्या भेडसावतात. या भावी पिढीच्या, त्यातही मुलींच्या आहाराकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे.

healthy hormonal health
Puberty : किशोरवयात येण्यापूर्वी मुलींनी चांगल्या हार्मोनल आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ खावेत; वाचा तज्ज्ञ काय सांगतात….
जागतिक सिकलसेल दिन विशेष; ना शिशुंचे स्क्रिनिंग, ना गर्भजल परीक्षण, उपचाराबाबत उदासीनता
तरुणींसाठी योग्य आहार
सिकल सेल अ‍ॅनिमिया

मधुराची आई, मीरा मला काळजीने सांगू लागली ‘आम्ही गेले काही महिने वजन वाढविण्यासाठी वेगवेगळी औषधं देतोय, पण काहीच उपयोग होत नाही. तिचं खाणं बेताचंच आहे. त्यामुळे तिचं वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करतेय मी. ती खेळतेसुद्धा आहे. त्यामुळे डाएटमध्ये काही बदल वगरे करायचा का?’

‘पण मला तेवढीच भूक लागते. माझा मेटॅबॉलिझम चांगला आहे,’ मधुराने काहीसं नाराजीच्या स्वरात उत्तर दिलं.

‘तुला वजन वाढविण्यासाठी औषधांची गरज आहे असं वाटतं का?’ मी मधुराला विचारलं. त्यावर तिने आईकडे पाहत ‘मम्माला वाटते. मी खूप स्किनी आहे असं सगळेच म्हणतात. आणि औषध घेतलं की मला ओव्हरडोस झाल्यासारखं वाटतं. पोट फुगल्यासारखं वाटतं. गॅसी वाटतं’

त्यावर मधुराच्या आईने खुलासा केला ‘कारण पाणी कमी पितेस तू. तुझ्या पोषणासाठीच तुला सारखं पाणी प्यायला सांगते मी’

क्लिनिकमध्ये मधुरा काहीशी नाराज होऊन आईसोबत बसली होती. आठवीतली मधुरा शाळेच्याच गणवेशातच आईसोबत आली होती. म्हणायला बारीक अंगकाठी, गोलाकार चेहरा, डोक्यावर मशरूम केसांचा हलकासा तांबडय़ा रंगाचा केशसंभार, चमकदार डोळे आणि नाराजीतही गालावर पडणारी खळी अशी ती माझ्यासमोर बसली होती. तिच्यात आईचेच बरेचसे जीन्स तंतोतंत दिसत होते.

‘पण तुम्ही द्याल ते शेवटचं औषध बरं का..’ मधुराने मला सांगता सांगता एकदा आईकडे पाहिलं. तिच्या आवाजातल्या हलक्याशा तीव्र सुराने मला गंमत वाटली. त्यावर मी म्हटलं की ‘तिला मी खाण्यातूनच औषध देते.’

‘या, डाएट्स . आय नो! मी मधे खूप चॉकोलेट्स आणि दररोज मांसाहार पण केला होता.’ मधुरा म्हणाली.

‘त्याने थोडा फरक पडला होता.’ इति मीरा

‘हो, दीड किलो वजन वाढलं होतं. पण िपपल्स आले होते.’ मधुराचा नाराज स्वर.

‘ते पीरिअड्सच्या वेळी येणं नॉर्मल आहे.’ मीराच्या या वाक्यावर मात्र माझ्या डोक्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, ड जीवनसत्त्वाचा अभाव अशा गोष्टी फेर धरून नाचू लागल्या.

‘आणि मला पिरिअड्सच्या वेळी पोटात दुखतं. डॉक्टरांनी दिलेलं औषध घेतलं की बरं वाटतं.’ मधुराला पटकन आठवलं.

‘पण नेहमी नेहमी गोळ्या देणं जरा अति वाटतं मला. मलाही पोटात दुखायचं पण हिच्याइतकं नाही.’ इति मीरा.

मासिक पाळीआधी पोटात दुखणं, विचित्र वागणं, चक्कर येणं हे खरं तर अपुरं पोषण आणि शरीरातील बदलत्या संप्रेरकांमुळे आहे. मीरा आणि मधुराचं बोलणं ऐकताना आईच्या बोलण्यात पोषक आहार आणि शारीरिक स्वास्थ्य  याबद्दलची काळजी डोकावत होती आणि मधुराच्या बोलण्यातून ‘नको ते औषध!’ असा सूर!

मधुराच्या खाण्यापिण्याच्या वेळापत्रकाचं विश्लेषण केल्यावर लक्षात आलं की तिच्या आहारात भरपूर भाज्यांसोबत तेवढंच जंक फूड अर्थात तळलेले, खारट पदार्थ यांचादेखील समावेश आहे. शारीरिक श्रमांबाबतीत थोडी आळशी असलेली मधुरा शालेय खेळांमध्ये बऱ्यापकी सहभागी होत होती. किशोरवयीन मुलींच्या आहाराबाबत असणारे अनेक संभ्रम हे त्यांच्या खाण्याच्या वेळा, खाण्यासाठी उपलब्ध असणारे पर्याय, त्यांचे मूड (मानसिक अवस्था ), त्यातून त्यांना हवे असणारे आहार वैविध्य यांमधून निर्माण झालेले असतात.

आणखी वाचा : मेंदी रंगतच नाहीये का?…हे उपाय करुन बघाच

मधुराच्या बाबतीत तिच्या आईने काळजी करणं रास्त होतं. आणि यावर उपाय म्हणून आहारातील काही चुकांची दुरुस्ती करणंदेखील तितकंच आवश्यक होतं. मधुरासारख्या किशोरवयीन मुलीच्या आहारामध्ये बदल करताना केवळ कागदी लिखापढी उपयुक्त ठरत नाही. प्रात्यक्षिक करावं लागतं.

मधुराच्या बाबतीतदेखील मी तेच केलं. तिच्या नाश्त्यापासून ते रात्री जेवणापर्यंत ५० टक्के बदल करत तिचं खाणं दुरुस्त केलं.

आहारात ‘नको ते तीळ’ म्हणणाऱ्या मधुराला जीवनसत्त्वांची कमतरता भासू  नये म्हणून वेगवेगळ्या तेलबियांची चॉकोलेटसदृश घरगुती चिक्की तिला खायला दिली.

तेलबियांमध्ये केवळ स्निग्ध पदार्थच नाही तर प्रथिनं आणि जीवनसत्वंदेखील असतात. केवळ तीळ, शेंगदाणे याव्यतिरिक्त भोपळा, सूर्यफूल, करडई, जवस यांसारख्या तेलबियांचा किशोरवयीन मुलींच्या आहारात समावेश असायलाच हवा. घरचं तूप, लोणी, दही, ताक या पदार्थामुळे कॅल्शिअम वाढतं. स्नायू तसंच हाडांचं आरोग्य सुधारतं. तसंच संप्रेरकांवर देखील उत्तम परिणाम होतो. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ दररोज आहारात असायला हवेत.

मासिक पाळीदरम्यान तेलबिया, दुग्धजन्य पदार्थ यांचं सेवन प्रामुख्याने करावं. गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लोह, फॉलिक अ‍ॅसिड यासाठी औषधं घ्यावीत.

दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजेच कबरेदकं : आहारात वेगवेगळ्या धान्यांचा आणि डाळींचा समावेश असावा. डाळींच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये भाज्यांचं प्रमाणदेखील वाढवावं.

पदार्थ आकर्षक करताना त्यात नसíगक तत्त्वं राहावीत याची काळजी घ्यावी. पालक, कोिथबीर यांचा आहारात समावेश जरूर करावा. अलीकडे बाजारात मिळणारे चिप्स सर्रास खाल्ले जातात. चिप्समध्ये असणाऱ्या मीठ, रासायनिक द्रव्यं तसंच चुकीच्या स्निग्ध पदार्थाच्या प्रमाणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे.

तरुण मुली आजूबाजूच्या, त्यांना प्रभावी वाटणाऱ्या व्यक्तींचं अनुकरण करत असतात. त्यामुळे आवडत्या व्यक्तीने (ज्यात आवडत्या अभिनेत्याचा किंवा जाहिरातीचादेखील समावेश असतो) घातलेले कपडे, घडय़ाळ याव्यतिरिक्त खाण्याचा प्रभावदेखील जास्त असतो.

अलीकडे अनेक प्रसिद्ध व्यक्ती शीतपेयांच्या जाहिरातीत करतात. आणि हीच शीतपेयं जास्त प्रमाणात विकली जातात. शाळांमध्ये तसंच महाविद्यालयांमध्ये अनेक शीतपेयांचं वाटपही केलं जातं. अशा वेळी चांगले आणि वाईट पदार्थ यातील फरक समजणं आणि तो अमलात आणणं याबद्दलचे संस्कार घरातूनच व्हायला हवेत.

आजकाल चहा आणि कॉफी पिणारा किशोरवयीन वर्ग वाढलेला आहे. खरं तर वाढत्या वयात उत्तेजना देणाऱ्या पदार्थाची आवश्यकता नसते. वयाच्या विशीपर्यंत प्रत्येक मुलीने आहारात या पदार्थाचं सेवन करणं आवश्यक आहे.

  • नाश्त्यासाठी थालीपीठ, फळं, पराठा, फ्रँकी, अंडी किंवा उपमा यांसारखे उत्तम प्रथिनं आणि ऊर्जा देणारे पदार्थ खाणं आवश्यक आहे.
  • मधल्या वेळेतील खाणं म्हणून फळं, बदाम, अक्रोड, मनुके, खजूर यांचं सेवन करणं आवश्यक आहे.
  • पाण्याऐवजी शीतपेयं पिणं टाळायला हवं.
  • गुलकंदाचं सरबत किंवा सब्जा मिल्कशेक ही पेये हितवर्धक आहेत.
  • भात पूर्ण वज्र्य करण्यापेक्षा घावन, तांदळाची भाकरी या रूपात आहारात तांदुळाचा समावेश करायला काहीच हरकत नाही.

आपण जे पदार्थ खातो त्यांची आजच्या किशोरवयीन मुलामुलींना गूगलकृपेने बरीच माहिती असते. खरं तर प्रत्येक किशोरवयीन पिढीला चमचमीत पदार्थाची माहिती असतेच. त्यात आजची तंत्रज्ञानी पिढी मागे कशी असेल?

मग यात मुलींमध्ये झिरो फिगरचं फॅड येणं स्वाभाविक असलं तरी स्वास्थ्यभान असणंदेखील आवश्यक आहे. मोबाइल, टॅब, लॅपटॉप, संगणक यांसारखी आयुधं रात्रंदिवस सोबत बाळगताना कुटुंबाला वेळ देणं हा खरा फेसटाइम आहे. कुटुंबाला द्यायचा वेळ वाढवून संगणकीय वेळ शक्य तितका कमी करणंदेखील तितकंच आवश्यक आहे.

अनेकदा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे मुलांच्या वागण्यात बदल होतो. त्याबाबत पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोलणं अपेक्षित असतं. त्यामुळे नात्याची वीण घट्ट होते. किशोरवयीन मुलांच्या आहारातील महत्त्वाची जीवनसत्त्वं आणि त्यांचे उपयोग जेव्हा प्रत्यक्ष परिणाम दर्शवितात तेव्हा त्यावर ठाम विश्वास ठेवला जातो.

मधुराला दिलेल्या डाएटमुळे कॅल्शिअम, मँगनीज, ड जीवनसत्त्वांची कमतरता या गोष्टींवर मात करता आली. त्याचे परिणामही दिसून आले. पर्यायाने तिचा योग्य त्याच खाद्यपदार्थाचे सेवन करण्याकडे कल वाढला.

मधुरासारख्या आहाराबाबत मनात गोंधळ असलेल्या अनेक किशोरवयीन मुली आहेत. त्यांच्यासाठी भारत सरकारने सप्टेंबर या राष्ट्रीय पोषण महिन्याच्या निमित्ताने काही आहारविषयक नियम निश्चित केले आहेत.

  • प्रत्येक किशोरवयीन मुलीला जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि मुबलक पोषण देणारा आहार  मिळायलाच हवा.
  • लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड यांची कमतरता भरून काढण्यासाठी आठवडय़ातून एकदा निळी गोळी (लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडसाठी पूरक औषध) देण्यात यावी. याचा आरंभ खेडय़ापाडय़ातून केला जावा.
  • त्यांनी उच्च प्रतीचं दूध पिणं तसंच दुग्धजन्य पदार्थ खाणं आवश्यक आहे.
  • आहारात चांगल्या तेलाचा तसंच आयोडीनयुक्त मिठाचा योग्य प्रमाणात समावेश असावा.
  • प्रत्येक मुलीला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं.
  • उत्तम आरोग्यासाठी शारीरिक स्वछता राखणं महत्त्वाचं आहे. मासिक पाळीच्या दिवसात याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

यानिमित्ताने ‘हम फिट, तो इंडिया फिट’ या नाऱ्याची सुरुवात किशोरवयीन मुलींपासून होते आहे हेही नसे थोडके!
सौजन्य – लोकप्रभा