डोकेदुखी ही कोणत्याही वयात भेडसावणारी अतिशय सामान्य तक्रार. त्याची कारणेही निरनिराळी असू शकतात. या डोकेदुखीचे नेमके कारण शोधणे हे एक आव्हानच. कधी सर्दीमुळे तर कधी उन्हामुळे, कधी पित्त झाल्याने तर कधी पुरेशी झोप न झाल्याने दुखणारे डोके थांबवायचे कसे हा प्रश्नच असतो. कधीतरी अंगातील शक्ती कमी झाल्याने, तर कधी रक्तातील साखर कमी झाल्यानेही डोकेदुखी होते. या त्रासावर एखादवेळी गोळी घेणे ठिक आहे. मात्र वारंवार पेनकिलर्स घेणे आरोग्यासाठी घातक असते. अशा गोळ्यांमुळे यकृताला तर त्रास होतोच. शिवाय त्याचे शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात. मात्र काही घरगुती उपायांनी यावर आराम मिळविता येतो. घरी सहज करु शकू, अशी काही पेये डोकेदुखीवर अतिशय उपयुक्त ठरु शकतात. तसेच ही पेये नैसर्गिक असल्याने ती आरोग्यासाठीही चांगली असतात.

जिंजर टी

Mumbai, Get Respite Sweltering, Mumbai Get Respite Heat, Temperatures Drop, 34 Degrees, mumbai summer, summer news, summer in mumbai, summer temperature in mumbai, mumbai heat, mumbai sweltering, mumbai Temperature, mumbai news, summer news,
मुंबईकरांची काहिली कमी होणार
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
woman exposes scammers who posed as police officer on instagram watch viral video
VIDEO : “तुझी बहीण आमच्या ताब्यात; तिला सोडव नाही, तर…”; पोलिसांच्या नावे येणाऱ्या ‘अशा’ कॉल्सपासून राहा सावधान!

शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी जिंजर अतिशय उपयुक्त असते. जिंजर टीमुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. दीर्घकाळपासून असणाऱ्या डोकेदुखीसाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे.

बदाम दूध

बदामामध्ये असा एक घटक असतो ज्यामुळे सेलिसिलिक अॅसिडची निर्मिती होते. अॅस्पिरीन या डोकेदुखीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळीमध्ये हे अॅसिड काही प्रमाणात असते. त्यामुळे बदाम दूध हे डोकेदुखीपासून सुटका होण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. बदामामध्ये मॅग्नेशियम आणि इतरही काही घटक असतात ज्यामुळे डोकेदुखी दूर होते.

पेपरमिंट टी

शरीरातील स्नायू आणि नसांना आराम मिळण्यासाठी पेपरमिंट टी उपयुक्त असतो. स्नायू आणि नसांना आराम मिळाल्याने डोकेदुखी थांबण्यास मदत होते. एक कप पाण्यामध्ये ८ ते १० पेपरमिंट टीची पान घालून हे पाणी उकळावे. यामध्ये तुमच्या आवडीनुसार मधही घालू शकता. यामुळे काही वेळातच डोकेदुखी थांबू शकते.

टोमॅटो सूप

टोमॅटोमध्ये अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. तसेच या सूपमधील आंबट-गोड पदार्थांमुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. टोमॅटो सूपमध्ये योग्य प्रमाणात मीठ आणि मसाला वापरुन सूप घ्यावे.

लिंबूपाणी

लिंबूपाणी आरोग्याच्या विविध तक्रारींवर उपयुक्त असते. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायल्यास डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्याउठल्या लिंबूपाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. पोटात असणाऱ्या गॅसेसमुळे जर तुमचे डोके दुखत असेल तर लिंबू पाणी हा त्यावरील उत्तम उपाय ठरु शकतो.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाईन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)