बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाच्या खाण्या-पिण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. बदलत्या आहाराचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यातून मग आहारविषयक अनेक समस्या निर्माण होतात. या समस्येमध्ये वाढतं वजन ही सध्याच्या काळात मोठी समस्या निर्माण झाली आहे. वजन वाढल्यानंतर अनेक जण डाएट, व्यायाम करणं यासारख्या मार्गांचा अवलंब करतात. अनेकवेळा आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग करावा लागतो. मात्र वजन कमी करण्यासाठी प्रत्येक पदार्थाचा त्याग करणं गरजेचं नसल्याचं रुपा सिन्हा यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही सॅण्डविच असे आहेत की ज्यांच्या सेवनामुळे आपल्या डाएट प्लॅनमध्ये यत्किंचितही बदल होत नाही. उलट आपलं वजन कमी करण्यासाठी त्याची मदतच होते. चला तर मग जाणून घेऊयात, वजन कमी करणाऱ्या सॅण्डविचविषयी –

सध्याची तरुणाई फास्टफूडच्या आहारी गेली आहे. त्यामुळे चायनिज, मैद्यापासून तयार केलेल पदार्थ त्यांच्याकडून सर्रास खाल्ले जातात. मैद्यापासून तयार केलेला ब्रेड खाल्ल्यामुळे त्याचं नीट पचन होत नाही. परिणामी, त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होत असतो. पचन नीट न झाल्यामुळे वजनात वाढ होते. मात्र गव्हापासून तयार केलेला ब्रेड किंवा सॅण्डविचमध्ये वापरण्यात आलेल्या भाज्यांमुळे आपण आपलं वजन नियंत्रणात आणू शकतो.

१. पीनट बटर आणि केळ्याचं सॅण्डविच-
पीनट बटर आणि केळ्यापासून तयार केलेलं सॅण्डविच खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. पीनट बटरमध्ये प्रोटीनची मात्र मोठ्या प्रमाणावर असते आणि केळ्यामध्ये कॅल्शिअम, लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यापासून तयार केलंलं सॅण्डविच खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहतं.

२.टूना सॅलेड टोस्ट :
दुपारच्या जेवणामध्ये पौष्टीक पदार्थांचा समावेश करायचा असेल तर हे सॅण्डविच नक्कीच फायदेशीर ठरेल. या सॅण्डविचसाठी तयार करण्यात येणारा ब्रेड हा धान्यांपासून तयार करण्यात येतो. तर टूना सॅलेड तयार करण्यासाठी मेयॉनीज आणि कोबीच्या पानांचा वापर करण्यात येतो. या सॅण्डविचमध्ये प्रोटीनचं प्रमाण सर्वाधिक असतो. यात केवळ ४२० कॅलरीज असतात.

३. बेरी आणि आल्मंड बटर सॅण्डविच –
बेरीमध्ये अॅटीऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त असतं. तर आल्मंड बटरमध्ये प्रोटीन भरपूर असतात. या दोघांच्या सेवनामुळे वजन झपाट्याने कमी होतं. त्यामुळे या सॅण्डविचचा आपल्या आहारात समावेश असावाच.

४. वांगी आणि मोजरेला सॅण्डविच-
वांगी म्हणजे अनेकांच्या नावडतीची भाजी. मात्र वांग्यांमध्ये वजन कमी करणारे घटक असतात. हे सॅण्डविच तयार करण्यासाठी धान्यांपासून तयार केलेला ब्रेड वापरण्यात येतो. यात वांग्याचे काप, पालक , टोमॅटोचा वापर करण्यात येतो. या सॅण्डविचमध्ये ४१० कॅलरीजचं प्रमाण असतं

५. ग्रील्ड चीज मशरुम सॅण्डविच –
चीज खाल्ल्यामुळे वजन वाढतं असा अनेकांचा समज असतो. मात्र चीजमुळे वजन कमी करण्यास मदत होत असते. ग्रील्ड चीज मशरुम सॅण्डविचमध्ये ३०० कॅलरीज असतात. त्यामुळे या सॅण्डविचमुळे झपाट्याने वजन कमी होतं.