News Flash

अवघ्या ६० डॉलरचे श्रवणयंत्र

भारतीय वंशाच्या मुलाचा शोध; बंगळुरूला येऊन आजोबांना पहिले यंत्र भेट

| April 14, 2016 02:07 am

भारतीय वंशाच्या मुलाचा शोध; बंगळुरूला येऊन आजोबांना पहिले यंत्र भेट
भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलाने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अत्यंत कमी खर्चाचे श्रवणयंत्र शोधून काढले असून, त्याची किंमत अवघी साठ अमेरिकी डॉलर आहे. ज्यांना खर्चीक यंत्रे परवडत नाहीत, त्यांना हे यंत्र वरदानच आहे. केंटुकीतील लुइसव्हिले सिटी येथील मुकुंद व्यंकटकृष्णन या मुलाने दोन वर्षांच्या मेहनतीनंतर हे यंत्र तयार केले असून, ते जेफरसन कौंटी पब्लिक स्कूलच्या संकल्पना महोत्सवात सादर केले आणि त्याला केंटुकी स्टेट सायन्स अँड इंजिनीअरिंग फेअरमध्ये पहिला पुरस्कार मिळाला आहे.
या यंत्रात स्वस्त हेडफोन वापरले असून, यंत्राची चाचणी विविध कंपतेच्या आवाजासाठी यशस्वी झाली आहे. यात आवाज मोठा केला जातो. तुम्हाला किती कमी ऐकू येते त्या प्रमाणात सात प्रकारच्या कंपतेचे आवाज यात हेडफोनच्या मदतीने वाढवता येतात. यात हे यंत्र स्वआज्ञावली चालवते, त्यामुळे मध्यस्थ किंवा डॉक्टरांची मदतही लागत नाही. श्रवणयंत्रांची किंमत १५०० डॉलरपेक्षा जास्त असते, पण मी ते ६० डॉलर्समध्ये तयार केले आहे, असे मुकुंद याने सांगितले. यात एक संस्कारक (प्रोसेसर) वापरलेला असतो, त्यामुळे आवाज वाढवला जातो तोच सर्वात खर्चीक भाग असतो, पण त्याची किंमत ४५ डॉलर असून इतर भागांची किंमत १५ डॉलर आहे.
मुकुंद भारतात आजी-आजोबांकडे दोन वर्षांपूर्वी आला होता तेव्हा त्याला श्रवणयंत्र बसवण्यासाठी आजोबांची तपासणी करून आणण्यास सांगण्यात आले होते. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की, श्रवणयंत्रे खूप महाग असतात. त्याला पर्यायी श्रवणयंत्र स्वस्तात तयार केले पाहिजे. भारतात श्रवणतज्ज्ञांची वेळ मिळवणे, त्यांच्याकडे जाणे हे कठीण काम आहे. त्याने सांगितले की, डॉक्टरांच्या उपचारासाठी ४०० ते ५०० डॉलर खर्च होतात व श्रवणयंत्राचा खर्च भारतात १९०० डॉलरच्या आसपास जातो, त्यामुळे विकसनशील देशातील गरीब लोकांना अडचणी येतात. भारतात काही लोकांची वार्षिक प्राप्ती सरासरी ६१६ डॉलर आहे, त्यांना श्रवणयंत्रे परवडत नाहीत. मुकुंदने जे श्रवणयंत्र तयार केले आहे, त्याचा मुख्य भाग म्हणजे इअरपीस बदलणे सोपे आहे तो महाग नाही.
हे उपकरण दोन इंचांचे असून ते संगणकाच्या संस्कारकासारखे दिसते. खिशातही ते ठेवता येते. १००० डॉलरचे श्रवणयंत्र ज्यांना परवडत नाही, त्यांना तो हे श्रवणयंत्र उपलब्ध करून देणार आहे. त्याचे आजोबा बंगळुरूला असतात. तो उन्हाळ्याच्या सुटीत भारतात येणार असून आजोबांना हे यंत्र देणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2016 2:06 am

Web Title: hearing aid in 60 dollars
Next Stories
1 सर्वाधिक आरोग्य विमा मधुमेहग्रस्तांचाच!
2 व्यायाम, वजनावर नियंत्रण यामुळे मधुमेह आटोक्यात
3 उन्हाळ्यात जलद उर्जास्रोतासाठी व्यायामाबरोबर आहारात या पदार्थांचे सेवन करा!
Just Now!
X