News Flash

हृदयाच्या झडपा स्वस्तात तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित

उत्पादन किमतीपेक्षा जास्त दराने पसे घेऊन रुग्णांची लूट केली जात होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

हृदयाच्या धमनीत निर्माण होणारे रक्तप्रवाहातील अडथळे दूर करणारे स्टेंट आतापर्यंत भारतीय रुग्णालयांमध्ये चढय़ा दराने विकले जात होते. उत्पादन किमतीपेक्षा जास्त दराने पसे घेऊन रुग्णांची लूट केली जात होती. आता त्याबाबत काही नियमावलीही केली जात आहे. आता हे स्टेंट्स आणखी स्वस्तात तयार करण्यासाठी नवीन पद्धत कोलोरॅडो स्टेट विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केली आहे. त्यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये बसवले जाणारे स्टेंट हे कमी खर्चात तयार करता येतील. हे स्टेंट (झडपा) बसवल्याने रक्तवाहिन्यातून रक्त वाहण्यास अवरोध निर्माण होत नाही.
धमन्यांमध्ये चरबीसदृश थर बसून त्या अरुंद बनतात. त्या मोकळ्या करण्यासाठी संबंधित जागी स्टेंट लावला जातो. स्टेंट (झडप) म्हणजे एक प्रकारच्या झडपाच असतात व आता नवीन पद्धतीत त्या लवचीक हायुलरोनन असते. प्लास्टिकच्या बनवण्यात आल्या आहेत. त्यात रक्त साकळू नये यासाठीची उपचारपद्धती वापरावी लागत नाही. नवीन झडपा पॉलिमेरिक पॉलिथिलिनच्या असून त्या खूप स्वस्त आहेत व त्या उत्पादित करणेही सोपे आहे. आताच्या आयात करण्यात येणाऱ्या धातूच्या झडपांपेक्षा त्यांची किंमत निम्मीच आहे. अजून त्याच्या वैद्यकीय चाचण्या चालू असून दोन वर्षांत हे स्टेंट म्हणजे झडपा बाजारात येतील. या झडपांमध्ये दर्जा धातूच्या व जैविक उतींपासून बनवलेल्या झडपांपेक्षा चांगला असावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. झडपा बनवण्यासाठी उतींचा वापर केला जातो व त्याच वेळी रक्ताच्या गुठळ्या टाळण्यासाठी औषधेही कमी वापरावी लागतात. पीएसजी इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रीसर्च या संस्थेचे अधिष्ठाता डॉ. आर. रामिलगम यांनी सांगितले की, भारत व अमेरिका सरकारने या प्रकल्पासाठी आíथक मदत केली आहे. ओहिओ विद्यापीठातील प्रमुख संशोधक लक्ष्मी प्रसाद दासी यांनी संशोधनाचे नेतृत्व केले असून पीएसजी रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. मुरुगेशन यांनी भारताच्या वतीने प्रतिनिधित्व केले आहे. नवीन झडपा पॉलिमेरिक पॉलिथिलिनच्या असून त्या खूप स्वस्त आहेत व त्या उत्पादित करणेही सोपे आहे. अनेक हृदयरोगात झडपा नवीन बसवाव्या लागतात. देशी बनावटीची टीटीके चित्रा हा व्हाल्व्ह म्हणजे झडप धातूची असून ती २२ हजार रुपयांना मिळते तर आयात केलेली झडप ४५ हजार रुपयांना मिळते. शिवाय आताच्या टीटीके चित्रा नावाच्या बसवल्या तरी नंतर सतत औषधे घ्यावी लागतात पण ती ३०-४० वष्रे टिकते. बायोप्रोस्थेटिक झडपेसाठी दीड लाख रुपये खर्च येतो पण त्या झडपा १०-१५ वष्रे टिकतात. त्या लावल्यावर औषधांची गरज नसते असे मुरुगेशन यांनी सांगितले. म्हणजे टीटीके चित्रा व बायोप्रोस्थेटिक या दोन्ही प्रकारच्या झडपांचे अनेक तोटे आहेत. एक तर त्या महाग आहेत, त्यांचा कार्यकाल कमी-जास्त आहे, शिवाय वरून औषधेही घ्यावी लागतात त्यामुळे खर्च वाढतो. नवीन पॉलिमेरिक पॉलिथिलिनच्या झडपा स्वस्त असून त्यात औषधेही लागत नाहीत. त्यांचे प्रयोग डुकरे व मेंढय़ांवर चालू असून ते यशस्वी झाल्यावर टीटीके हेल्थकेअर कंपनी त्यांचे उत्पादन करणार आहे. सध्याच्या झडपा महाग असून त्यामुळे मुख्यमंत्री योजनेतून शस्त्रक्रिया कराव्या लागतात. पुढे ती वेळ येणार नाही.

भारतातील स्थिती
*  झडपा बसवण्याच्या शस्त्रक्रिया
वर्षांला ३० हजार
* स्वदेशी टीटीके चित्रा झडपांचा
वापर- ८ हजार
* आताच्या झडपांची किंमत २२
हजार ते सव्वा लाख
* नव्या पॉलिथिन झडपेचे फायदे
* पॉलिमेरिक पॉलिथिलिनचा वापर
* किंमत खूप कमी
* औषधांची गरज लागत नाही.
* टिकतातही जास्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 12:54 am

Web Title: heart deices problems
Next Stories
1 सकारात्मक विचारसरणीचा हृदयविकारात फायदा
2 आशियाई इबोलाचे विषाणू सर्व राज्यांमध्ये सक्रिय
3 पुढील वर्षी डेंग्यूची साथ आणखी गंभीर
Just Now!
X