चालणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. मात्र अनेकांना टाचदुखी किंवा तळवे दुखीची समस्या असते. त्यामुळे अनेक वेळा चालताना किंवा उभं राहिल्यावर ही समस्या तीव्रतेने जाणवते. चालत असताना शरीराचा भार गुडघे, पावले आणि पायांच्या तळव्यावर येतात. शरीराचा भार पेलता यावा यासाठी पायाच्या तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. या तळव्यांमध्ये प्लान्टर फेशिया हा स्नायूंचा पडदा असतो. या प्लांटर फेशियाला इजा होऊन लहान भेगा (मायक्रो टियर्स) निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे स्नायू घट्ट होतात आणि टाचदुखी सुरू होते साधारणत: चाळिशी ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये टाचदुखीची समस्या सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतं. या टाचदुखीवर काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.

१. टाच दुखत असताना कोमट पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि या पाण्यामध्ये १५ ते २० मिनीटे पाय टाकून बसावे. या पाण्यामुळे पायांना शेक मिळाल्यानंतर टाचदुखी काही प्रमाणात कमी होते.

priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न
pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”

२. टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. त्यामुळे अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळे घरामध्ये असताना कायम मऊ चपल किंवा स्लीपरचा वापर करावा.

३.फिजिओ थेरेपीचे काही सोपे व्यायाम, एक्सरसाईज असतात ते करावेत. यामध्ये भिंतीला हात टेकवून पायाच्या बोटांवर उभं राहावं आणि टाचा वर उचलाव्यात. या अशा स्थितीमध्ये जागच्या जागी जॉगिंग करायचा प्रयत्न करावा.

४. या व्यायाम प्रकारातील सोपा प्रकार म्हणजे पायाच्या बोटांनी टॉवेल जवळ आणण्याचा प्रयत्न करणे. यामध्ये जमिनीवर टॉवेल पसरावा आणि त्यावर पाय ठेवून पायांच्या बोटांच्या मदतीने टॉवेलचं एक टोक आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करणे

५. विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन त्यावर रुईचे पान बांधावे आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्यावा.

६. गोडेतेल आणि मीठ एकत्र करुन हा लेप टाचेवर लावाला आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवावी.