News Flash

पावसाळ्यात घोंगावणा-या माश्यांचा होतोय त्रास? मग करा हे घरगुती उपाय

माश्या उपद्रवी वाटत नसल्या तरीही त्यांच्यामुळे विविध आजार पसरण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात निसर्गाचं रुपडं बदलतं, वातावरण आल्हाददायक होते मात्र या दिवसात डास, माश्या, किटक यांचादेखील त्रास वाढतो. माश्या उपद्रवी वाटत नसल्या तरीही त्यांच्यामुळे विविध आजार पसरण्याची शक्यता असते. अशा त्रासदायक माश्यांपासून काही अंशी सुटका करून घेण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात.

1. कापूर- रोज संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. घरात चारही कोपर्‍यात कापराच्या गोळ्या टाका.

2. तुळस- तुळशीमधील औषधी गुणधर्मासोबत किटकांना दूर ठेवण्याची क्षमतादेखील आहे. घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो.

3. निलगिरी- निलगिरीच्या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हवाबंद डब्यात ठेवा. ज्याठिकाणी कीटक किंवा माश्यांचा त्रास जाणवेल, तेथे हा डबा उघडा करून ठेवा.

4. लिंबू- लिंबू चे दोन तुकडे करुन त्यात सहा ते सात लवंगा रोवा. लवंगाची चार कोन्यावाली बाजू वरच्या बाजूस असेल असे लिंबूमध्ये लवंगा रोवा. घरात जिथे जास्त माश्या दिसतील तिथे हा लिंबू ठेवून द्या. घरात माश्या येणार नाही.

5. पुदिना- सुक्या पुदिन्याची पाने वाटून एका कापडात ते गुंडाळून त्याचे छोटे गाठोडे बनवून घरात ठेवावे. याने माश्या घरात येणार नाही.

या घरगुती उपायांसोबतच घर स्वच्छ ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वच्छतेमुळे माश्यांचा, किटकांचा घरातील वावर कमी होतो. घरातील ज्या ठिकाणी स्वयंपाक केला जातो ती जागा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. कचर्‍याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावणे गरजेचे आहे. घरातील झाडांची पुरेशी काळजी घ्या. त्यांना अतिप्रमाणात पाणी घालू नका. सुकलेली पानं, कचरा वेळीच साफ करा.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 1:43 pm

Web Title: here are a few best way to keep flies away this rainy season ssv 92
Next Stories
1 Kia Motors ची शानदार एसयूव्ही Seltos , 25 हजारात करा बुकिंग
2 कसा आहे 5 रिअर कॅमेरे असलेला Nokia 9 PureView ?
3 Amazon Prime Day : 48 तासांसाठी बंपर सेल आणि आकर्षक डिस्काउंट
Just Now!
X