13 July 2020

News Flash

‘हीरो-यामहा’ची भागीदारी, लाँच केली शानदार ‘इलेक्ट्रिक सायकल’

सायकलच्या दोन्ही बाजूंना हायड्रोलिक डिस्क ब्रेक आहेत. तर, पुढील बाजूला हायड्रोलिक सस्पेंशन आहे.

देशातील दिग्गज सायकल निर्माती कंपनी Hero Cycles ने जपानची कंपनी Yamaha Motor सोबत भागीदारी करत इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. Lectro EHX20 असं या इलेक्ट्रिक सायकलचं नाव आहे.

ही प्रीमियम इलेक्ट्रिक सायकल ऑफ-रोड वापरासाठी बनविण्यात आली आहे. ही सायकल म्हणजे गेल्या वर्षी हीरो सायकल लिमिटेड, यामाहा मोटर कंपनी आणि मित्सुई अँड कंपनी लिमिटेडमध्ये झालेल्या भागीदारीचं पहिलं उपकरण आहे. या ई-सायकलमध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर जपानमध्ये डिझाइन आणि डेव्हलप करण्यात आली आहे. तर, गाझियाबादच्या कारखान्यात मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आली. हीरो कंपनी अन्य देशांमध्ये या सायकलची निर्यात देखील करणार आहे.

अॅडव्हेंचर प्रेमी बाइकर्सचा विचार करुन या इ-सायकलची निर्मिती करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक सायकल मेट्रो शहरांमधील हीरो सायकल्सच्या आउटलेट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. या सायकलमध्ये सेंटर-माउंटेड मोटर देण्यात आली आहे.

बॅटरी आणि रेंज –
या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 10.9 AH क्षमतेची बॅटरी आहे. बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 80 किमीपर्यंतचा प्रवास करता येईल. दोन किलोपेक्षा कमी वजन या बॅटरीचं असून पूर्ण चार्ज होण्यास 3 ते 5 तासांचा वेळ लागतो. या सायकलमध्ये विविध पाच मोड देण्यात आले आहेत, सर्व मोड वेगवेगळ्या पावरचं आउटपुट देतात.

फीचर्स –
फ्लॅगशिप इलेक्ट्रिक सायकल लेक्ट्रो ईएचएक्स20 मध्ये डिजिटल डिस्प्ले आहे. यामध्ये रेंज, बॅटरी आणि अन्य मोड्सबाबत माहिती मिळते. सायकलच्या दोन्ही बाजूंना हायड्रोलिक डिस्क ब्रेक आहेत. तर पुढील बाजूला हायड्रोलिक सस्पेंशन आहे.

किंमत –
1.30 लाख रुपये इतकी या इलेक्ट्रिक सायकलची किंमत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 1:01 pm

Web Title: hero cycles ties up with yamaha motor lectro e cycle series launched sas 89
Next Stories
1 TVS ने आणली ‘स्पेशल स्कूटर’, किंमत किती?
2 बहुप्रतिक्षित iphone 11 च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरूवात
3 Amazon Great Indian Festival ची झाली घोषणा, काय असणार ऑफर्स?
Just Now!
X