दिवाळीमध्ये नवी स्कुटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासमोर एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. हीरो मोटोकॉर्पने भारतात आपली नवी स्कुटर लॉन्च केली आहे. Hero Destini 125 असं या नव्या स्कुटरचं नाव असून यासोबतच 125 सीसी या रेंजमध्येही कंपनीने पाऊल ठेवलं आहे. Destini 125 LX आणि Destini 125 VX अशा दोन व्हेरिअंट्समध्ये कंपनीने ही स्कुटर सादर केली आहे. येत्या तीन ते चार आठवड्यांमध्ये या स्कुटरची ग्राहकांपर्यंत डिलिव्हरी सुरू होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

ही नवी स्कुटर 110 सीसीच्या Hero Duet प्रमाणे दिसते, मात्र यामध्ये काही कॉस्मेटिक अपडेट्स पाहायला मिळतील. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ऑटो एक्सपो 2018 मध्ये कंपनीने सर्वप्रथम Hero Duet 125 या नावानेच ही स्कुटर सादर केली होती. कंपनीच्या जयपूरमधील प्रकल्पातच या स्कुटरची निर्मीती करण्यात आली आहे.

या स्कुटरमध्ये ऑप्शनल फ्रंट डिस्क ब्रेक, इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (आयबीएस), साइड स्टँड इंडीकेटर, सर्विस रिमायंडर, पास स्विच आणि एक्सटर्नल फ्युअल फिलिंगचा समावेश आहे. तर हीरो डेस्टिनी 125 व्हीएक्समध्ये बूट लाइट, मोबाइल चार्जिंग पॉइंट, क्रोम फिनिश, कास्ट व्हिल्स आणि ड्युअल टोन सीट कव्हर देण्यात आलं आहे. यामध्ये सिंगल-सिलिंडर, एअरकूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 8.7hp पावर आणि 10.2Nm पिकटॉर्क जनरेट करतं. चांगल्या मायलेजसाठी कंपनीने या स्कुटरमध्ये आयडल-स्टार्ट-स्टॉप-सिस्टिम म्हणजे i3S ही सिस्टीम दिली आहे. पुढील आणि मागील बाजूला 10 इंच अलॉय व्हिल्स असून यामध्ये ट्युबलेस टायर्सचा वापर करण्यात आला आहे. होंडा ग्राजिया, सुझुकी अॅक्सेस 125 आणि टीव्हीएस एनटॉर्क यांसारख्या स्कुटरला यामुळे तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. Destini 125 LX ची किंमत 54,650 रुपये (एक्स शोरूम) आणि Destini 125 VX ची किंमत 57,500 रुपये (एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे.