Hero Electric ने एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. Hero Electric Dash या नावाने ही नवी ई-स्कूटर बाजारात उतरवण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 60 किलोमीटरपर्यंतचं अंतर ही स्कूटर कापते.

सध्या देशभरात हिरो इलेक्ट्रिकचे 615 टचपॉइंट असून याद्वारे स्कूटरची विक्री होईल. 2020 पर्यंत देशात एक हजार टचपॉइंट सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. याशिवाय पुढील तीन वर्षांमध्ये दरवर्षी 5 लाख युनिट प्रॉडक्शन घेण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.

हीरो डॅशमध्ये 28Ah लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी पूर्ण चार्ज करण्यास चार तासांचा वेळ लागतो. या स्कूटरमध्ये एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, युएसबी चार्जिंग पोर्ट, ट्युबलेस टायर आहे. 62 हजार रुपये (एक्स-शोरुम) इतकी या स्कूटरची किंमत ठरवण्यात आली आहे.

हे देखील वाचा – शानदार मायलेजसह Hero Electric च्या दोन नव्या इ-स्कूटर लाँच   

गेल्याच आठवड्यात कंपनीने Optima ER आणि Nyx ER या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या होत्या.