News Flash

Hero च्या स्वस्त इ-स्कुटरवर भरघोस डिस्काउंट, Paytm चीही भन्नाट ऑफर

या इ-स्कुटरमध्ये 48V बॅटरी दिली असून एकदा चार्ज केल्यास 50 किमीची रेंज

हीरो इलेक्ट्रिकने आपल्या ‘फ्लॅश’ या स्वस्त इ-स्कुटरवर डिस्काउंटची घोषणा केलीये. कंपनी या स्कुटरवर 7,088 रुपयांची सवलत देतेय, ही ऑफर मर्यादित कालावधीपर्यंतच असेल.

डिस्काउंटनंतर ही इ-स्कुटर 29 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, ईशान्य भारतात ही स्कुटर खरेदी करण्यासाठी 32 हजार 710 रुपये मोजावे लागतील. याशिवाय पेटीएमद्वारे ही बाइक खरेदी केल्यास कंपनीकडून 10 हजार 500 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळतील.

या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये LED हेडलाइट्स , मोबाइल चार्जिंग, रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टिम यांसारखे फीचर्स आहेत. स्कुटरचं वजन केवळ 69 KG असून कमी वजनामुळे ही स्कुटर सहजरित्या हाताळता येते. या स्कुटरमध्ये 48V बॅटरी दिली असून एकदा चार्ज केल्यास 50 किमीची रेंज मिळेल. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी आठ तासांचा वेळ लागतो. भारतात ही स्कुटर 615 टचपॉइंट्सवर उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 10:43 am

Web Title: hero electric flash e scooter discount now starts at rs 29990 sas 89
Next Stories
1 डिझायर आणि होंडा अमेझला टक्कर, आज लाँच होणार Hyundai Aura
2 ‘रॉयल एनफील्ड’ची अ‍ॅडव्हेंचर बाइक Himalayan लाँच, बुकिंगलाही झाली सुरूवात
3 आली Maruti ची नवीन Celerio, किंमत 4.41 लाख रुपये
Just Now!
X