Hero MotoCorp ने आपली लोकप्रिय एंट्री लेवलची बाइक HF Deluxe नव्या अवतारात लाँच केली आहे. 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या नियमांनुसार, 125 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या बाइकमध्ये कॉम्बि-ब्रेकिंग सिस्टीम असणं आवश्यक आहे. परिणामी कंपनीने इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टिम(IBS) हे फीचर या बाइकमध्ये देण्यात आलं आहे. नव्या Hero HF Deluxe IBS ची एक्स शोरुम किंमत 49 हजार 67 रुपये ठेवण्यात आली आहे.

किक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट अशा दोन्ही प्रकारात ही बाइक उपलब्ध आहे. या बाइकमध्ये i3S (आयडल स्टार्ट स्टॉप सिस्टीम) टेक्नॉलजी देण्यात आली आहे.

या तंज्ञज्ञानामुळे बाइकचा मायलेज उत्तम राहिल आणि उत्सर्जन कमी होईल. i3S तंत्रज्ञानाशिवाय देखील ही बाइक उपलब्ध आहे. याशिवाय या बाइकमध्ये मोठे ड्रम ब्रेक देण्यात आलेत. बाइकच्या इंस्ट्रुमेंट क्लस्टरमध्येही काही अपडेट देण्यात आलेत. यामध्ये 97.2cc, सिंगल-सिलिंडर इंजिन असून हे इंजिन 8.36bhp ची पावर आणि 8.05Nm पीक टॉर्क जनरेट करतं. बाइकमध्ये 4-स्पीड ट्रांसमिशन असून एक लिटर पेट्रोलमध्ये 88.24 किमीपर्यंतचा दमदार मायलेज मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

ही बाइक नव्या ‘हेवी ग्रे विथ ग्रीन’ या रंगासह ब्लॅक, कँडी ब्लेजिंग रेड, ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ पर्पल या रंगामध्ये उपलब्ध असेल. या वर्षामध्ये अपडेट करण्यात आलेली एचएफ डीलक्स ही हीरो कंपनीची पहिलीच बाइक आहे.