News Flash

आता आली ‘हीरो’ची HF डीलक्स , मिळणार अधिक मायलेज

बाइकमध्ये 'एक्ससेन्स' तंत्रज्ञानासह फ्यूअल इंजेक्टेड इंजिन

Hero Motocorp ने भारतीय बाजारात BS6 मानकांसहीत Hero HF Deluxe ही बाइक आणली आहे. कंपनीने ही बाइक दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध केली आहे. नवीन एचएफ डीलक्सच्या सेल्फ-स्टार्ट अ‍ॅलॉय-व्हिल व्हेरिअंटची किंमत 55 हजार 925 रुपये आणि सेल्फ-स्टार्ट अ‍ॅलॉय-व्हिल i3S व्हेरिअंटची किंमत 57 हाजर 250 रुपये आहे. या दोन्ही एक्स-शोरुम किंमती आहेत.

या बाइकवर नवीन ग्राफिक्स देण्यात आलेत. बाइकमध्ये ‘एक्ससेन्स’ तंत्रज्ञानासह फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनामुळे बाइकला 9% अधिक मायलेज आणि उत्तम अ‍ॅक्सलरेशन मिळेल असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. या बाइकमध्ये 97.2 सीसी क्षमतेचे इंजिन असून हे अद्ययावत इंजिन 8000 आरपीएमवर 7.94 बीएचपी ऊर्जा आणि 6000 आरपीएमवर 8.05 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. नवीन एचएफ डीलक्स बाइकला हिरोच्या जयपूर येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब, सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलजीमध्ये डिझाइन आणि डेव्हलप करण्यात आलंय. याशिवाय ही बाइक आता एकूण पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात ब्लॅक आणि रेड, ब्लॅक आणि पर्पल, ब्लॅक आणि ग्रे आणि टेक्नो ब्ल्यू आणि हेवी ग्रेसह ग्रीन या नव्या रंगांचा समावेश आहे.

आणखी वाचा – JAWA ची नवीन बाइक Perak, 10 हजारात बुकिंगला सुरूवात

यापूर्वी कंपनीने स्प्लेंडर आयस्मार्ट ही बाइक BS6 मानकांसह लाँच केली होती. ही कंपनीची पहिली बीएस-6 बाइक ठरली. त्यानंतर लगेचच कंपनीने एचएफ डिलक्स अपग्रेड करुन बाजारात आणली. लवकरच कंपनीची उर्वरित उत्पादनेही BS6 अपग्रेड केली जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 2:27 pm

Web Title: hero hf deluxe launched in india know price and all details sas 89
Next Stories
1 एमआरआय तंत्राने बुद्धिमत्ता पातळीचा अंदाज शक्य, संशोधनात उलघडा
2 खरंच ई-सिगारेटवर कारवाई होतेय का? राज्यांकडून मागवला अहवाल
3 नववर्षात Kia Seltos च्या किंमतीत बदल, ‘ही’ आहे नवी किंमत
Just Now!
X