News Flash

‘हिरो’ Maestro Edge 125 च्या किंमतीत बदल, जाणून घ्या नवी किंमत

तरुणांना आकर्षित करण्याच्या हेतूने या स्कुटरचं डिझाइन, किंमत बदलली

‘हीरो मोटोकॉर्प’ने मे महिन्यामध्ये आपली नवीन आणि बहुप्रतीक्षित स्कुटर Hero Maestro Edge 125 लाँच केली होती. कार्ब्युरेटर ड्रम ब्रेक, कार्ब्युरेटर डिस्क ब्रेक आणि फ्युअल इंजेक्टेड व्हेरिअंट अशा तीन व्हेरिअंटमध्ये कंपनीने ही स्कुटर लाँच केली होती. अनुक्रमे 58 हजार 500 रुपये, 60 हजार रुपये आणि 62 हजार 700 रुपये इतकी या तिन्ही व्हेरिअंट्सची एक्स शोरूम किंमत होती. आता लाँचिंगच्या अवघ्या दोन महिन्यांमध्येच कंपनीने या स्कुटरच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. तिन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. किंमतीत वाढ करण्याचं नेमकं कारण कंपनीकडून सांगण्यात आलेलं नाही मात्र उत्पादनासाठी वाढलेला खर्च यामागील कारण असण्याची शक्यता आहे. नवी किंमत कंपनीच्या संकेतस्थळावर अपडेट करण्यात आली आहे.

या स्कुटरमध्येही कंपनीने Destini 125 मध्ये वापरण्यात आलेलं 125cc इंजिन दिलं आहे. यातील फ्युअल इंजेक्टेड व्हेरिअंट म्हणजे देशातील पहिली फ्युअल इंजेक्टेड स्कुटर आहे. या व्हेरिअंटमधील इंजिन 7,000rpm वर 9.2hp पावर आणि 5,000rpm वर 10.2Nm पीक टॉर्क जनरेट करतं. तर, कार्ब्युरेटर व्हेरिअंटमधील इंजिन 6,750rpm वर 8.83hp पावर आणि 5,000rpm वर 10.2Nm टॉर्क जनरेट करतं.
तरुणांना आकर्षित करण्याच्या हेतूने या स्कुटरचं डिझाइन तयार करण्यात आलं आहे. यामध्ये एक्स्टर्नल फ्युअल-फिलर कॅप आणि डिजिटल अॅनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यामध्ये हीरो कंपनीचं स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञान (Hero i3S) देण्यात आलं असून मायलेज उत्तम असेल असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय स्कुटरच्या सीटखाली युएसबी पोर्ट आहे. स्कुटरच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे मोनोशॉक सस्पेंशन आहे. स्कुटरचं पुढील चाक 12 इंच आणि मागील चाक 10 इंचाचं आहे. ब्ल्यू, ब्राउन, ग्रे आणि रेड या चार मॅट फिनिश कलर्सचा पर्याय ग्राहकांपुढे आहे.

डेस्टिनी 125 नंतर हीरो कंपनीची ही दुसरी 125cc क्षमतेची स्कुटर आहे. भारतीय बाजारात या स्कुटरची टक्कर टीव्हीएस एनटॉर्क आणि होंडा ग्रॅझिया यांसारख्या स्कुटरशी आहे. या दोन्ही स्कुटरची किंमत अनुक्रमे 59 हजार 900 रुपये आणि 60 हजार 723 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 9:48 am

Web Title: hero maestro edge 125 price changed know all features and new price sas 89
Next Stories
1 Oppo च्या ‘या’ लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमतीत कपात
2 विक्रमी कार उत्पादनानंतरही टेस्ला कंपनीला तब्बल 408 दशलक्ष डॉलर्सचा तोटा
3 झोमॅटो, स्विगीला ग्राहकांची का पसंती? डिस्काऊंटसाठी नाही; जाणून घ्या खरं कारण
Just Now!
X