27 May 2020

News Flash

Hero ने बंद केल्या चार टू-व्हीलर, कंपनीने वेबसाइटवरुनही हटवल्या गाड्या

करोनामुळे नवीन Xtreme 160R ची लाँचिंगही पुढे ढकलण्याचा निर्णय...

(सांकेतिक छायाचित्र)

Hero MotoCorp ने आपल्या चार टू-व्हीलर्स बंद केल्या आहेत. यामध्ये Glamour, Passion XPro बाइक आणि Maestro 110, Duet 110 स्कूटर्सचा समावेश आहे. या गाड्या वेबसाइटवरुनही हटवण्यात आल्या असून या चार दुचाकी बीएस-6 अपडेटमध्ये लाँच न करण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय. या चार दुचाकींशिवाय कंपनीने XTreme 200T, Xtreme 200R आणि Xtreme 200S या गाड्याही वेबसाइटवरुन हटवल्या आहेत. पण, 200cc क्षमतेचे हे तिन्ही मॉडेल बीएस-6 इंजिनमध्ये अपडेट करुन पुन्हा बाजारात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

कंपनीने यापूर्वीच Glamour FI, Passion Pro i3S आणि Splendor Pro i3S या गाड्या बीएस-6 मध्ये अपडेट केल्या आहेत. आता या गाड्या Glamour BS6, Passion Pro BS6 आणि Splendor Pro BS6 नावाने सादर केल्या जातील. तर, hero maestro 110 आणि hero duet 110 या दोन स्कूटर्सना कंपनीच्या गेल्या वर्षी लाँच झालेल्या नवीन maestro 125 ने रिप्लेस केले आहे.

याशिवाय कंपनीने आपली पहिली 160सीसी बाइक Hero Xtreme 160R पुन्हा आणली आहे. ही बाइक कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. Xtreme 160R एप्रिल महिन्यात लाँच होणार होती, पण करोना व्हायरसमुळे या बाइकची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय बाजारात या बाइकची टक्कर बजाज पल्सर NS160, सुझुकी जिक्सर आणि टीव्हीएस अपाचे RTR 160 4V यांसारख्या बाइकसोबत असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 1:00 pm

Web Title: hero motocorp discontinues 4 models including glamour passion xpro maestro 110 and the duet scooters in india sas 89
Next Stories
1 WhatsApp चं नवीन फीचर, व्हिडिओ कॉलिंग झाली अजून मजेदार
2 Maruti Suzuki चा जलवा, ‘डेडलाइन’आधीच विकल्या लाखो कार
3 World health day : निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली कोणती माहितीये?
Just Now!
X